मालेगावातील जन्म दाखला घोटाळ्याचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन!
भाजप नेते किरीट सोमय्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
08-Jan-2025
Total Views |
मुंबई : मालेगाव येथे बाांग्लादेशी आणि रोहिंग्यांना देण्यात येणाऱ्या जन्माच्या दाखल्याच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी बुधवार, ८ जानेवारी रोजी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
मालेगाव हे बांग्लादेशी आणि रोहिंग्यांचे आश्रयस्थान बनले असून वर्षभरात इथे सुमारे १ हजार घसुखोर बाांग्लादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय असल्याचा दाखला देण्यात आल्याचा प्रकार किरीट सोमय्यांनी उघडकीस आणला होता. दरम्यान, आता या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.