‘पुष्पा २’ची बॉक्स ऑफिसवर क्रेझ अजूनही कायम, १२०० कोटींचा गल्ला केला पार
07-Jan-2025
Total Views |
मुंबई : दाक्षिणात्य सूपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असणारा 'पुष्पा २ - द रुल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापुर्वीच १०० कोटींचा गल्ला पार केला होता. त्यानंतर चित्रपटाने अवघ्या कमी कालावधीत १००० कोटींचा पल्ला बॉक्स ऑफिसवर पार करत भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला आहे.
अल्लू अर्जूनचा ‘पुष्पा २’ चित्रपट ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. प्रदर्सनापासून आत्तापर्यंत या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ७२५.८ कोटी, दुसऱ्या आठवड्यात२६४.८ कोटी, तिसऱ्या आठवड्यात १२९.५ कोटी, चौथ्या आठवड्यात ६९.६५ कोटी कमवून आत्तापर्यंत १२०८.९७ कोटी कमावले आहेत.
‘पुष्पा २ : द रुल’ या चित्रपटात अल्लू अर्जून, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच, लवकरच ‘पुष्पा ३’ हा चित्रपटाचा तिसरा भाग येणार असून तिसऱ्या भागात विजय देवरकोंडा असेल अशी चर्चा आहे. त्यामुळे ‘पुष्पा १’ आणि ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता तिसऱ्या भागासाठी प्रेक्षक अधिकच उत्सुक आहेत.