मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करणार
06-Jan-2025
Total Views |
कोल्हापूर : 'एचएमपीव्ही' हा व्हायरस नवीन नाही. यापूर्वीसुद्धा तो आलेला आहे. लगेच पूर्णपणे घाबरून जाण्याची आवश्यकत नाही, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. सोमवार, ६ जानेवारी रोजी त्यांनी कोल्हापूरात माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "प्राथमिक माहिनुसार, हा व्हायरस नवीन नाही. यापूर्वीसुद्धा तो आलेला आहे. पुन्हा त्या व्हायरसचा चंचुप्रवेश होताना दिसत आहे. लवकरच आम्ही यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करू. केंद्र सरकारचे आरोग्य मंत्रालयसुद्धा राज्यांना याबाबतची सगळी माहिती उपलब्ध करून देणार आहे. त्यानंतर आवश्यक ती काळजी आपण घेऊ. पण आता लगेच पूर्णपणे घाबरून जाण्याची आवश्यकत नाही. माध्यमांनीसुद्धा यासंदर्भात कपोलकल्पित माहिती देऊ नये. अधिकृत माहितीच त्यांनी पोहोचवली पाहिजे. आपल्यापर्यंत लवकरात लवकर जास्तीत जास्त अधिकृत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे."
बीड हत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना सुरक्षा पुरवण्याबाबत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. याबाबत बोलताना ते म्हणाले की, "या सगळ्या प्रकरणात राज्य सरकारने अत्यंत निर्धाराने कारवाई केली आहे. आम्ही मागे हटलेलो नाही आणि कोणाला सोडणारही नाही. कोणी कुणाला धमक्या देण्याचा प्रयत्न केल्यास त्यालासुद्धा सोडणार नाही."