आम आदमी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात

यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप दुर्दैवी

    29-Jan-2025
Total Views | 45
Modiji And Kejriwal

नवी दिल्ली
: हरियाणाने दिल्लीत वाहत येणाऱ्या यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा अतिशय दुर्दैवी आहे. आम आदमीं पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली असून पराभवाच्या भितीने ते असे आरोप करत आहेत, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi about AAP ) यांनी बुधवारी केला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्तारनगर येथे जाहिर सभे संबोधित केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले, दिल्लीच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनी हरियाणाच्या लोकांवर घृणास्पद आरोप केले आहेत. पराभवाच्या भीतीने 'आपदा'चे लोक गोंधळले आहेत. हरियाणाचे लोक दिल्लीतील लोकांपेक्षा वेगळे आहेत का, हरियाणात राहणाऱ्यांचे नातेवाईक दिल्लीत राहत नाहीत का आणि हरियाणाचे लोक त्यांच्या स्वतःच्या नातेवाईकरांचे पिण्याचे पाणी विषारी करू शकतात का, असा सवाल त्यांनी जनतेस विचारला. त्याचप्रमाणे हरियाणाने पाठवलेले पाणी आपण स्वत:, सर्व न्यायमूर्ती आणि अनेक लोक पित असल्याचाही टोला यांनी आपला लगावला आहे. ज्या देशात पाणी देणे हे पुण्याचे काम समजले जाते, त्या देशात असे आरोप करणे हा केवळ हरियाणाच्याच नव्हे तर देशातील जनतेचा अपमान असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

दिल्लीत ८ फेब्रुवारीनंतर स्थापन होणारे भाजप सरकार सर्व आश्वासने वेळेत पूर्ण करेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, दिल्लीकरांनी २५ वर्षे काँग्रेस आणि आप सरकारचा कारभार पाहिला आहे. त्यामुळे यावेळी भाजपला जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी. देशभरात विविध राज्यांमध्ये डबल इंजिन सरकारने अनेक बदल घडविले आहेत. मात्र, दिल्लीत ते शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे दिल्लीचा कायापलट करण्यासाठी भाजपलाच निवडून द्या, असेही आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात असल्याचा आरोप, तिरुपती मंदिर प्रशासनाकडून अधिकाऱ्याचं निलंबन

चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात असल्याचा आरोप, तिरुपती मंदिर प्रशासनाकडून अधिकाऱ्याचं निलंबन

(Tirupati Balaji Mandir) आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी मंदिरातील एका अधिकाऱ्यावर तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) प्रशासनाने तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. ए राजाशेखर बाबू असे निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते सहाय्यक कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होते. चर्चमधील प्रार्थनेमध्ये उपस्थित राहत ख्रिश्चन धर्माचा प्रचार-प्रसार करण्यात सहभागी होत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर तिरुमला तिरुपती देवस्थान प्रशासनाने त्यांना निलंबित केले आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121