श्रीनगर, दि.२८: प्रतिनिधी भारतीय रेल्वेने शनिवारी श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानकापासून श्रीनगर रेल्वे स्थानकापर्यंत पहिल्या वंदे भारत ट्रेनची यशस्वी चाचणी घेतली आहे. ही ट्रेन भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल असलेल्या अंजी खाड पुलावरून आणि जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब पुलावरून धावली. काश्मीर खोऱ्यातील थंड हवामान लक्षात घेऊन ही ट्रेन तयार करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी ११:३० वाजता कटरा येथून श्रीनगरच्या नौगाम स्थानकावर पोहोचली.
श्रीनगर स्थानकावर थोडा वेळ थांबल्यानंतर, ट्रेनने बडगाम स्थानकापर्यंत चाचणी सुरू ठेवली. या प्रवासात ट्रेनने जगातील सर्वात उंच रेल्वे पूल रियासी येथील चिनाब पूल, जो उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंकवर येतो तो पार केला.काश्मीरमधील हवामानासाठी खास डिझाइन केलेली ही ट्रेन रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि या प्रदेशाला उर्वरित भारताशी जोडण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. ट्रेन स्टेशनवर येताच रेल्वे अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने लोक जल्लोष करत आणि घोषणा दिल्या.
वंदे भारत एक्सप्रेसने ट्रेन १५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली-कानपूर-अलाहाबाद-वाराणसी मार्गावर १६० किमी प्रतितास वेगाने धावण्यास सुरुवात झाली. त्यावेळी ती ताशी १६० किलोमीटर वेगाने धावली होती. बर्फाळ प्रदेशातून धावणाऱ्या या वंदे भारतचे वैशिष्ट्य म्हणजे वंदे भारतच्या काचेवर कधीही बर्फ जमा होऊ शकत नाही. ती उणे ३० अंश तापमानातही वेगाने धावते. याशिवाय, त्यात विमानासारखे फीचर्सदेखील जोडण्यात आली आहेत. नवी दिल्लीहून निघालेली अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेली वंदे भारत रेल्वे शुक्रवारी संध्याकाळी ६.१५ वाजता श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. आठ कोच असलेल्या या वंदे भारतची चाचणी शनिवार, दि.२५ रोजी कटरा आणि बडगाम रेल्वे स्थानकादरम्यान घेण्यात आली. ही रेल्वे कटरा येथून सकाळी ८ वाजता निघाली. सकाळी ११:३० वाजता श्रीनगरच्या नौगाम स्थानकावर पोहोचली.