गणेशोत्सवानिमित्त खास सांगितीक पर्वणी

    09-Sep-2024
Total Views |
 
ganpati
 
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पुढचे काही दिवस मुंबईतील विविध मंडळे आणि सोसायट्यांमध्ये असे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. चेंबूर मधील नेल्लाई सोसायटीमध्ये सुद्धा अशाच एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नेल्लाई सोसायटीच्या सभासदांनी त्रिभुक्ती" या नाविन्यपूर्ण शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता नेल्लाई सोसायटीच्या आवारात हा कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रमात प्रसिद्ध कलाकार स्वीकार कट्टी (सतार), ह्रिषीकेश मजुमदार (बांसुरी) आणि रोहित देव (तबला) एकत्रित कलाविष्कार प्रस्तुत करणार आहेत. हा कार्यक्र सर्वांसाठी विनामूल्य आहे. भारतीय शास्त्रीय अभिजात संगीत आपल्या संस्कृतीचा एक महत्वाचा घटक असून अनेक लोक यामुळे प्रोत्साहित होतील या उद्देशाने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने भारतीय शास्त्रीय संगीत जोपासणाऱ्या अनेक युवा कलाकारांना आपली कला प्रस्तुत करण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण होईल.