आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सोडलेली मोदी एक्सप्रेस सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना
आमदार नितेश राणे यांनी दादर रेल्वे स्टेशनवर दाखवला झेंडा, चाकरमानी गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
04-Sep-2024
Total Views |
मुंबई : गणेशोत्सवाच्या निमित्ताने आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांकरिता दादर ते कणकवली पर्यंत मोफत सोडण्यात आलेली मोदी एक्स्प्रेस आज सकाळी ११.३० वाजता दादर स्टेशनवरून कोकणकडे रवाना झाली. प्रवाशांच्या उत्साहात, बाप्पाच्या जयघोषात ही रेल्वे सिंधुदुर्गसाठी रवाना झाली. आमदार नितेश राणे यांनी दादर स्टेशनवर मोदी एक्स्प्रेस ला झेंडा दाखवला.
गेली १२ वर्षे अविरतपणे आमदार नितेश राणे यांनी स्वखर्चाने गणेशभक्तांना प्रवासाची सुविधा दिली आहे. ८ वर्षे १०० रुपयांत कोकण प्रवास नंतर गेली ४ वर्षे पूर्ण ट्रेन प्रवासासाठी विनामूल्य सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दरवर्षी राबवत असलेल्या या उपक्रमाबद्दल गणेशभक्तांनी समाधान व्यक्त करत आमदार नितेश राणे यांचे आभार मानले.