“मिथुन चक्रवर्ती म्हणजे देशाचे सांस्कृतिक प्रतिक”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कौतुक

    30-Sep-2024
Total Views |

modi  
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर करण्त आला आहे. ७० व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये मिथुन चक्रवर्तींना हा सन्मान दिला जाणार असून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मिडियाद्वारी ही घोषणा केली आहे. मनोरंजन विश्वासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
 
दरम्यान, मिथुन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. “मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर झाला त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत दिलेल्या अतुलनीय योगदानाची ही पोचपावती आहे. अनेक दशकांपासून आपल्या अभिनयाची चित्रपटसृष्टीवर उमटवणारे मिथुन चक्रवर्ती हे देशाचे सांस्कृतिक प्रतिक आहेत. त्यांना माझ्याकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा!”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिथुन चक्रवर्ती यांचे कौतुक केले.
 
 
 
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पोस्ट करत लिहिले आहे की, "आम्हाला ही घोषणा करुन अत्यंत आनंद होत आहे की, दादासाहेब फाळके पुरस्कारांसाठी ज्युरींनी दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्तींची निवड केलीय. मिथुन चक्रवर्तींनी सिनेमाक्षेत्रात दिलेल्या विशेष योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. ८ ऑक्टोबरला होणाऱ्या ७० व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्तींचा हा खास सन्मान केला जाणार आहे."
 
मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म १६ जून १९५० रोजी झाला. कोलकातामधील एका बंगाली हिंदू कुटुंबात मिथुन यांचा जन्म झाला. पुण्यातील FTII मधून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं. मृणाल सेन दिग्दर्शित 'मृग्या' या सिनेमातून मिथुन चक्रवर्तींनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. आणि त्यानंतर एकाहून एक दर्जेदार कलाकृती त्यांनी चाहत्यांना दिल्या. दरम्यान, मिथुन यांनी अभिनयक्षेत्रासोबतच राजकीय क्षेत्रही गाजवलं आहे.