हिंदूंनो जागे व्हा...!! काळ भयानक आवाज देतोय...!!

बाबा महाकाल भक्ताचा व्हिडिओ होतोय व्हायरल

    30-Sep-2024
Total Views | 220

Sadhu Awakening Hindus

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Hindu Sadhu Viral Video)
"हिंदूंनो जागे व्हा...!! काळ भयानक आवाज देतोय...!!", अशी आरोळी देत एक साधू हिंदू समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेशच्या उज्जैन येथील आहे. सदर व्हिडिओमध्ये साधू रस्त्यावरून चालक हिंदू समाजाला आपल्या वाणीतून आवाहन करत असल्याचे दिसते आहे.

हे वाचलंत का? : काली मंदिरासमोर अवैध मांस आढळल्याने हिंदू भडकले, सीसीटीव्ही फुटेज आले समोर

त्या व्हिडिओत हातात त्रिशुळ घेतलेला एक साधू सर्वांना ओरडून सांगतोय की, "हिंदूंनो जागे व्हा; सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीचे रक्षण आपल्यालाच करावे लागेल. काही हिंदू अजूनही कानात तेल घालून झोपलेले आहेत, त्यांना उठवणे फार कठीण आहे. त्यांचे रक्त गोठले आहे, जे अजूनही गप्प आहेत त्यांनी समजावे की त्यांची मानसिक सुन्न झाली आहे." यावेळी त्यांनी 'नसबंदी थांबवा अन्यथा हिंदू वंश नष्ट होऊन जाईल' अशा घोषणाही दिल्याचे दिसते आहे.


पुढे साधूने पालकांना आवाहन करत लव्ह जिहाद सारख्या गंभीर मुद्द्याबाबतही भाष्य केले आहे. "हिदूंनो आज तुमच्याकडे एक मुलगा, एक मुलगी आहे. मुलगी लव्ह जिहादच्या जाळ्यात अकडून पळून गेली, मुलाचा मृत्यु झाला तर तुमच्याकडे काहीच राहणार नाही. त्यामुळे वेळीच सावध व्हा, ही शरमेची बाब आहे की हिंदूंच्या मुली लव्ह जिहादला बळी पडत आहेत."
अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121