प्रवाशांची गैरसोय होईल असं कृत्य करू नये! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आवाहन

    03-Sep-2024
Total Views |
 
MSRTC
 
मुंबई : सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल अशी कृती करू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
 
 
 
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक परिपत्रक जारी करत कर्मचाऱ्यांना संप न करण्याचे आवाहन केले आहे. "उद्या दि. ४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहावर कामगार संघटनांच्या कृती समितीला बैठकीकरिता बोलवले आहे. त्यामुळे महामंडळाच्या कर्मचारी बंधू-भगिनींनी ऐन सणासुदींच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल अशी कोणतीही कृती करू नये," असे आवाहन राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केले आहे.
 
हे वाचलंत का? -  एसटी कर्मचाऱ्यांनी संप करू नये! सकारात्मक चर्चेतून मार्ग काढू; मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन
 
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही कर्मचाऱ्यांना संप न करण्याचे आवाहन केले आहे. सकारात्मक चर्चेतून हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. एसटीच्या संपामुळे अनेक प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. दरम्यान, आता मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर कर्मचारी आपला संप मागे घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.