२५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था सदस्यांसाठी निवडणूक अधिकारी प्रशिक्षण

    27-Sep-2024
Total Views |

housing company
 
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या कायदा १५४ ब (६) अन्वये निवडणूक अधिकारी म्हणून निवडणूक घेणे आवश्यक आहे व सदर प्रशिक्षण घेण्याचा अधिकार सहकार कायद्यानुसार दि मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑप हौसिंग फेडरेशन ली. ला प्राप्त आहेत. नुकतेच सहकार विभागामार्फत ई वर्ग निवडणूक पॅनलवरील निवडणूक अधिकाऱ्याने पॅनलवर येण्याची प्रक्रिया सुरु आहे. संबंधित निवडणूक अधिकाऱ्याच्या पॅनलवर येण्यासाठी सहकार खात्याकडे अर्ज दाखल करावयाची अंतिम तारीख १४/१०/२०२४ पर्यंत आहे.
 
सदर निवडणूक पॅनलवर येण्यासाठी संचालकांनी /सभासदांनी निवडणूक प्रशिक्षण घेणे गरजेचे असून सदर निवडणूक प्रशिक्षणाचा दाखला सहकार खात्यास करावयाच्या अर्जासोबत जोडवयाचा आहे याकरिता दि मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑप हौसिंग फेडरेशन ली.मार्फत ई वर्गातील गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या ( २५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी संस्थांच्या ) निवडणूक अधिकारी प्रशिक्षण ऑनलाईन दि.०४/१०/२०२४ रोजी सायं ५.३० - ८.३० यावेळेत होईल. निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक लिंक ही पुढील प्रमाणे देण्यात आली आहे. 
mumbaihousingfederation.live
 
शुक्रवार दि.०४/१०/२०२४
ऑनलाईन मराठी / इंग्रजी
सायं -५.३० - ८.३०