नवी दिल्ली : देशातील इथेनॉल मिश्रणाला मिळालेल्या चालनेमुळे परकीय चलनास मोठा फायदा झाला आहे. दरम्यान, २०१४ सालापासून ९९,०१४ कोटी रुपयांचे परकीय चलन वाचविले आहे, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत १५ टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठले असून आगामी २०२५-२६ वर्षात पुरवठा २० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, इंटरनॅशनल बायोएनर्जी कॉन्फरन्समध्ये बोलताना पुरी म्हणाले, ऑटोमोटिव्ह इंधनामध्ये इथेनॉलच्या वाढत्या वापरामुळे २०१४ पासून १७.३ दशलक्ष मेट्रिक टन कच्चे तेलाची बचत करण्यास मदत झाली आहे. परिणामी, इतके मेट्रिक टन आयात करावे लागले असते, असेही केंद्रीय मंत्री पुरी यावेळी सांगितले.
परकीय चलन वाचवण्यासाठी आणि इथेनॉल मिश्रणातून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासोबतच सरकार शेतकरी आणि डिस्टिलर्सना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात येत आहे. दरम्यान, इथेनॉल मिश्रणामुळे २०१४ पासून ९९ हजार कोटींची परकीय चलनाची बचत झाली आहे. २०१४ पासून ऑटोमोटिव्ह इंधनामध्ये इथेनॉलचा वापर वाढल्याने १७.३ दशलक्ष मेट्रिक टन कच्चे तेल आयात करावे लागले नाही.