ब्रिटीशांनी भारत एकसंध केला ही कल्पना मूर्खपणाची!

गोवा राज्यपाल पी.एस.श्रीधरन यांचे प्रतिपादन

    30-Aug-2024
Total Views |

Goa Governor

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Goa Governor Bridging South Conclave)
"ब्रिटीशांनी भारत एकसंध केला ही कल्पना मूर्खपणाची आहे. भारत नेहमीच एकसंध, प्राचीन आणि सदैव नूतनीकरण करणारा आहे.", असे प्रतिपादन गोव्याचे राज्यपाल ॲड. पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी केले. गुरुवार, दि. २९ ऑगस्ट रोजी थिरुवनंतपुरम येथे आयोजित केसरीच्या ब्रिजिंग साऊथ कॉन्क्लेव्हदरम्यान ते बोलत होते.

हे वाचलंत का? : देश टिकवायचा असेल तर हिंदूत्व प्रबळ करावं लागेल

उपस्थितांना संबोधत पुढे ते म्हणाले, धर्म हा राज्याचा पाया आहे या मताशी ब्रिटीश असहमत होते. भारताचा राष्ट्रवाद अध्यात्मिक आहे आणि तो अध्यात्मापासून रहित नाही. आपल्या एकतेचे बीज आपल्या विविधतेत आहे, ज्याचे पालनपोषण केले पाहिजे. त्यांनी निदर्शनास आणून दिलेली केरळची त्रुटी म्हणजे राष्ट्रवादावर चर्चा करण्यात अनास्था असलेले राज्य बनले आहे. येथे सकारात्मक हालचालींऐवजी नकारात्मक हालचाली सुरू आहेत.

प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार यांनी आपल्या मुख्य भाषणात सांगितले की, भारतीय ओळख आणि राष्ट्रवाद नसलेले केरळ हे धोकादायक आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी अनेक उदाहरणे आहेत. जिथे राष्ट्रवाद नष्ट झाला आहे, ती जागा आता भारताची राहिली नाहीत. अशा प्रकारचे कॉन्क्लेव्ह हे फुटीरतावादी शक्तींना दिलेले प्रत्युत्तर आहेत जे भारतीय सर्वकाही जबरदस्तीने उखडून टाकू पाहत आहेत.

लोकांमध्ये फूट पाडणे ही विरोधी पक्षांची राष्ट्रीय पातळीवरील रणनीती आहे आणि ब्रिजिंग साऊथ कॉन्क्लेव्ह हे याविरुद्ध संरक्षण असल्याचे माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आपल्या भाषणादरम्यान म्हटले. यावेळी माजी राजदूत डॉ.टी.पी. श्रीनिवासन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. केसरीचे मुख्य संपादक डॉ. एन.आर. मधू, डॉ.के.एन. मधुसूदनन पिल्लई आणि राणी मोहन दास हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.