राम मंदिराविरोधात दलितांना भडकावणाऱ्या 'शान-ए-आलम'च्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

    02-Aug-2024
Total Views | 109

Ram Mandir Fake News

मुंबई (प्रतिनिधी) :
अयोध्येतील राम मंदिराबाबत भ्रामक बातम्या (Ram Mandir Fake News) पसरवणाऱ्या एका धर्मांधाला पोलिसांनी अटक केली आहे. शान-ए-आलम असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शान-ए-आलमने नुकताच एक व्हिडिओ व्हायरल केला होता. ज्यामध्ये दलित समाजाच्या लोकांना राम मंदिरात प्रवेश दिला जात नसल्याचे सांगण्यात येत होते. पोलिस तपासात हे आरोप निराधार असल्याचे आढळून आले आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी खोट्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीने त्याच्याविरुद्ध तक्रार करणाऱ्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. अखेर पोलिसांनी बुधवारी शान-ए-आलमला अटक केली.

हे वाचलंत का? : रामललाच्या नित्यदर्शनाकरीता येणाऱ्यांसाठी खुशखबर!

अयोध्येतील जिल्ह्यातील रामजन्मभूमी पोलीस स्टेशन परिसरात घडलेले हे प्रकरण आहे. येथे दि. ९ जून रोजी एका हिंदू तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारदाराने सांगितले की ९ जून रोजी तो त्याचे फेसबुक प्रोफाइल पाहत होता. तेव्हा त्याला शान-ए-आलम नावाच्या तरुणाचा आयडी दिसला. शान-ए-आलमने ६ जून रोजी त्याच्या आयडीवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये रामजन्मभूमी मंदिरात अनुसूचित जातीच्या लोकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे, असा खोटा प्रचार करण्यात आला होता.

शान-ए-आलमने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एससी श्रेणीतील अनेक जातींची नावेही घेण्यात आली आहेत. तेव्हा तक्रारकर्त्याने सांगितले होते की, तो अयोध्येत साधू-मुनींच्या सेवेत व्यस्त आहे, त्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. या तक्रारीवरून पोलिसांनी शान-ए-आलमविरुद्ध ९ जून रोजी आयपीसीच्या कलम ५०५ आणि ५०५ (२) अंतर्गत एफआयआर नोंदवला होता. पुढे आरोपीने तक्रारदाराला धमकवल्याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२ सोबत आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध तपास व इतर कायदेशीर कारवाई सध्या सुरू आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121