अनंत अंबानी-राधिका मर्चंटला लागली हळद! हळदीने माखले अंबानींचे व्याही

    09-Jul-2024
Total Views |

ambani  
 
 
 
मुंबई: अंबानी कुटुंबियांच्या घरी सध्या लग्नसराई सुरु असूने अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांचा हळदी समारंभ सोमवारी (८ जुलै रोजी) अँटिलियामध्ये थाटामाटात पार पडला. त्यांच्या हळदी समारंभाला बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तर अंबानींचे व्याही देखील हळदीने माखले होते.
 
दरम्यान, अनंत व राधिकाच्या ग्रॅंन्ड हळदी समारंभाला भाईजान सलमान खान, रणवीर सिंह, ओरी, अनन्या पांडे, सारा अली खान, मानुषी छिल्लर, जान्हवी कपूर, शिखर पहारिया, बोनी कपूर, वेदांग रैना असे अनेक कलाकार पोहोचले होते. या हळदी समारंभाला मुकेश अंबानी यांचे धाकटे भाऊ अनिल अंबानी व त्यांची पत्नी टिना मुनीम पोहोचल्या होत्या. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
तसेच, अनंत व राधिकाचे लग्न १२ जुलै २०२४ रोजी मुंबईतच होणार आहे. त्याच संध्याकाळी सहा वाजता आशीर्वाद समारंभ होईल. नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शनल सेंटर इथे हा सोहळा संपन्न होईल. यानंतर १४ जुलै रोजी शेवटचे रिसेप्शन होणार आहे,. ज्यामध्ये मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील विशेष लोकांना आमंत्रित करण्यात येईल.