अखेर ठरलं! 'या' दिवशी वसंत मोरे उबाठा गटात दाखल होणार

    04-Jul-2024
Total Views |
 
More
 
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे उबाठा गटात दाखल होण्याचा मुहूर्त निश्चित झाला असून येत्या ९ तारखेला त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली. वसंत मोरे यांनी गुरुवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
 
उबाठा गटाच्या संजय राऊतांनी वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशाबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता यावर शिक्कामोर्तब झाले आहे. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "९ तारखेला मातोश्रीवर पक्षप्रवेश होणार आहे. आज सगळ्या प्राथमिक चर्चा पार पडल्या. यावेळी साहेबांनी ९ तारीख दिली असून मातोश्रीवर मी माझ्या समर्थकांसह प्रवेश करणार आहे."
 
हे वाचलंत का? -  सुनील केदार यांना हायकोर्टाचा दणका!
 
"मी वंचितमध्ये गेलो पण वंचितच्या मतदारांनी मला स्विकारलं नाही. त्यामुळे पुण्यातील मतांचा टक्का हवा तेवढा मिळाला नाही. म्हणून मी आता शिवसेनेत प्रवेश करत आहे. माझी सुरुवात शिवसेनेपासून झाली आहे. त्यामुळे परत स्वगृही परतलो आहे. येणाऱ्या विधानसभेत उमेदवारी मिळाली तर खडकवासला आणि हडपसर हे दोन पर्याय माझ्यासमोर आहेत," असेही ते म्हणाले.