वसंत मोरे उबाठा गटाच्या वाटेवर!

    04-Jul-2024
Total Views |
 
Vasant More
 
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे उबाठा गटात प्रवेश करणार आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. वसंत मोरे गुरुवारी उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. त्याआधी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल खुलासा केला.
 
वसंत मोरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीबद्दल संजय राऊतांना विचारले असता ते म्हणाले की, "वसंत मोरे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. ते एका पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. पुण्यात त्यांचं सामाजिक आणि राजकीय कार्य चांगलं आहे. आज दुपारी ते उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत, हे खरं आहे. लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करतील हेसुद्धा तितकंच खरं आहे," असे ते म्हणाले.
 
लोकसभा निवडणूकीच्या आधी वसंत मोरेंनी मनसेची साथ सोडत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी वंचितच्या तिकीटावर पुण्यातून निवडणूकही लढवली होती. दरम्यान, आता वसंत मोरेंनी उबाठा गटात प्रवेश केल्यास वंचितला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जातं.