ऑगस्टमध्ये ओटीटीवर प्रदर्शित होणार ‘या’ धमाकेदार कलाकृती

    30-Jul-2024
Total Views |

ott movie 
 
 
मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे प्रेक्षकांना घरबसल्या जगभरातील विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या कलाकृतींचा आस्वाद घेता येतो. त्यामुळे बऱ्यावेळा हिंदीतील मोठे कलाकार त्यांचे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यास प्राधान्य देतात. आता ऑगस्ट महिन्यातही प्रेक्षकांना बरेच चित्रपट, वेब सीरीज पाहायची संदी मिळणार आहे. पाहूयात यादी...
 
चंदू चॅम्पियन
 
कबीर खान दिग्दर्शित आणि कार्तिक आर्यन अभिनित ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाने चित्रपटगृहात उत्तम कामगिरी केली होती. आणि आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर ९ ऑगस्टला चंदु चॅम्पियन प्रदर्शित होणार आहे.
 
फिर आई हसीन दिलरुबा
 
अभिनेता विक्रांत मेस्सी व अभिनेत्री तापसी पन्नू यांचा ‘हसीन दिलरुबा’ या २०२१ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा पुढचा ‘फिर आयी हसनी दिलरुबा’ नेटफ्लिक्सवर येत्या ९ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
 
मनोरथंगल
 
९ वेगवेगळ्या कथा आणि ८ दिग्दर्शकांची एकत्रित केलेलं काम असलेली ‘मनोरथंगल’ ही वेब सीरीज १५ ऑगस्ट रोजी झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. यात कमल हासन, मामूट्टी, मोहनलाल आणि फहाद फासिल यांच्या प्रमुख भूमिका असतील.
 
ग्यारह ग्यारह
 
डान्सर आणि टीव्ही होस्ट राघव जुयाल ‘किल’च्या निर्मात्यांसह ‘ग्यारह गयाह’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात अभिनेत्री कृतिका कामरा व धैर्य करवा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असून ९ ऑगस्ट रोजी झी५ वर प्रदर्शित होणार आहे.