मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आणि पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या विश्वस्त स्नेहलता देशमुख यांचे दि. २९ जुलै रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. स्नेहलता देशमुख यांनी गर्भसंस्कार, नवजात शिशू आणि माता यांचा आहार या विषयांमध्ये महत्त्वाचं कार्य केलं.
या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या अधिष्ठाताही होत्या. दुग्धपेढी ही त्यांची संकल्पना वैद्यकीय क्षेत्रात नेहमीच स्मरणात राहिल. त्यांची गर्भसंस्कार तंत्र आणि मंत्र, अरे संस्कार संस्कार, तंत्रयुगातील उमलती मने ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. तसेच सामाजिक कामासाठी त्यांना डॉ.बी.सी.रॉय पुरस्कार,धन्वंतरी पुरस्काराने गोरवण्यात आले होते.