पिंपरी-चिंचवडमधील संविधान भवन ‘दृष्टीक्षेपात’

‘पीएमआरडीए’कडून महानगरपालिकेला जागेचे हस्तांतरण

    29-Jul-2024
Total Views | 54

Mahesh Landge
 
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रस्तावित भारतीय संविधान भवन आता शहरवासीयांच्या दृष्टीक्षेपात आले असून, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) प्रशासनाने प्रस्तावित जागा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने भारतीय राज्यघटना आणि जगभरातील लोकशाही देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करता यावा. तसेच, संविधानाबाबत जनजागृती व्हावी. या करिता भारतातील पहिले संविधान भवन उभारण्यात येत आहे.
 
राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संविधान भवनाच्या उभारणीबाबत आमदार महेश लांडगे यांनी भेट घेतली होती. त्यावेळी प्रस्तावित संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारण्यास ‘पीएमआरडीए’ सक्षम नसेल, तर सदर जागा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करावी, अशी मागणी केली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला कार्यवाहीचे आदेश दिले होते.
 
दरम्यान, महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून सल्लागार नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. तसेच, पीएमआरडीएच्या हद्दीतील पेठ क्रमांक ११ मधील खुली जागा क्र. २ क्षेत्र २५८९४.२ चौ. मी. हे संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारणीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस हस्तांतरीत करण्यात आले. त्याचा ताबा दि. २३ जुलै २०२४ रोजी देण्यात आला. त्यामुळे संविधान भवन उभारणीच्या कामाला आता महानगरपालिकेच्या माध्यमातून गती देण्यात येणार आहे.
 
संविधान भवन उभारणीसाठी ‘पीएमआरडीए’कडून पेठ क्रमांक ११ मधील जागा महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. आता सल्लागार नियुक्तीसाठी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानुतर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येईल. त्यानंतर निविदा प्रक्रिया व प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल.
 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साकारलेली भारतीय राज्यघटना अर्थात संविधान यासह जगभरातील लोकशाही देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि भारतीय संविधानाचा प्रचार- प्रसार अन्‌ जागृती करण्यासाठी भारतातील पहिले संविधान भवन हे ज्ञानमंदिर पिंपरी-चिंचवडमध्ये साकारत आहे, ही निश्चित शहरवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121