सपाच्या आमदाराला ७ वर्षाची शिक्षा; दंगलखोरांशी संबध,बांगलादेशींना भारतात वास्तव्यास मदत!

    08-Jun-2024
Total Views | 34
 Irfan Solanki

लखनऊ :
उत्तर प्रदेशातील कानपूरमधील समाजवादी पक्षाटे आमदार इफान सोलंकी यांना एमपी-एमएलए न्यायालयाने ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. इरफानवर एका महिलेचे घर जाळणे आणि तिच्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप होता. ज्यामध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. या शिक्षेमुळे इरफानला त्याची आमदारकीही गमवावी लागू शकते. कानपूर दंगलीतील मुख्य आरोपीसोबत इरफानचे संबंध आहेत. तसेच आमदार म्हणून बेकायदेशीर रित्या बांगलादेशी नागरिकांना भारतीय असल्याचे त्यांनी सांगितले होते.


 
जाजमाऊच्या डिफेन्स कॉलनीत राहणाऱ्या नजीर फातिमा यांनी सपा आमदार इरफान सोलंकी, त्यांचा भाऊ रिझवान सोलंकी आणि त्यांच्या साथीदारांवर घराला आग लावण्याचा आरोप केला आहे. फातिमाचा आरोप आहे की, ७ नोव्हेंबर २०२२ रोजी ती आपल्या कुटुंबासोबत एका नातेवाईकाच्या लग्नाला गेली होती. घरी परत आल्यावर घराला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.दरम्यान फातिमाने असा ही आरोप केला की, इरफान सोलंकी त्याचा भाऊ रिझवान सोलंकी आणि त्याच्या साथीदारांनी तिच्या मुलाला मारहाण देखील केली. तसेच मुलाला आगीत धक्का देण्याचा प्रयत्न ही केला. याप्रकरणी जेव्हा पोलिसांनी एफआयआर दाखल केली तेव्हा तो साथीदारांसह फरार झाला.

तसेच या वर्षी दि. ४ एप्रिल २०२४ रोजी फातिमाची मुलगी शाळेत गेलेली असताना तिथून परत घरी आलेली नाही. दरम्यान मुलीची सायकल रेल्वे स्टेशन परिसरात सापडली. ज्यानंतर इरफानवर मुलीच्या अपहरणाचा आरोप फातिमा यांनी केला आहे. त्याबरोबर बांगलादेशी नागरिकांना भारतीय असल्याचे प्रमाणपत्र दिल्याचा ही इरफानवर आरोप होता. मुळात २०२२ साली कानपूर पोलिसांनी ५ बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. ज्यात २ पुरुष, २ महिला आणि एक अल्पवयीन मुलाचा समावेश होता. ते बांगलादेशी घुसखोर बनावट प्रमाणपत्राच्या आधारे भारतात स्थायिक झाले होते. ज्यांच्याकडून वेगवेगळे पासपोर्ट, आधारकार्ड सापडले. ज्याचे व्हेरिफेकेशन इरफान सोलंकी यांनी केले होते.



अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121