जंगलराज नही चलेगा! निलेश लंकेंच्या समर्थकाकडून गर्भवती महिलेवर हल्ला

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

    08-Jun-2024
Total Views |
 
Nilesh Lanke
 
मुंबई : शरद पवार गटाचे नेते आणि अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा कट्टर समर्थक असलेल्या राहुल झावरे याने गर्भवती महिलेवर हल्ला केल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच त्यांनी राक्षसीपणे आपला विजय साजरा केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 
गुरुवारी निलेश लंकेंचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, आता चित्रा वाघ यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत राहुल झावरेंवर गंभीर आरोप केला आहे.
 
 
 
चित्रा वाघ म्हणाल्या की, "आम्हाला निवडणुकीत आलेला पराभव आम्ही स्वीकारला. मात्र, शरद पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांचा विजय साजरा करण्याचा राक्षसी पॅटर्न दाखवून दिला. पारनेरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांनी राक्षसीपणे आपला विजय साजरा करण्यास सुरुवात केली. हाती दहा-पंधरा कार्यकर्त्यांना घेऊन महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा प्रचार करणाऱ्यांवर हल्ला सुरू केला. त्यांच्या डोक्यात सत्ता इतकी गेली की, उन्मत्त झालेल्या या राहुल झावरेने पानबंद यांच्या घरात घुसून एका गर्भवती महिलेवर आणि पानबंद यांच्या मातोश्रींवर शिवीगाळ करत जमावासह हल्ला केला," असे त्या म्हणाल्या.
 
"या नराधमाला कायदा तर शिक्षा देईलच मात्र, नवनिर्वाचित खासदार लंके आणि त्यांच्या नेत्या मोठ्ठया ताई या हरामखोर झावरेला शिक्षा देणार का पाठीशी घालणार हे पहावं लागेल. म्हणतात ना आलेलं यश पचवता आलं पाहिजे आणि मिरवतादेखील आलं पाहिजे. महविकास आघाडीच्या डोक्यात सत्ता जाऊ लागली. पण त्यांचा माज जय शिवरायांच्या पावनभूमीत सहन केला जाणार नाही. झावरे सारख्या औरंग्याच्या औलादिंना या जिजाऊच्या लेकीच धडा शिकवतील," असे त्या म्हणाल्या आहेत.