राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट?, फडणवीस-शाहांची भेट

    07-Jun-2024
Total Views |
devendra fadnavis mets amit shah
 

नवी दिल्ली :      महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या कामगिरीची जबाबदारी स्वीकारून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमधून बाहेर पडून पक्ष संघटनेत सक्रिय होण्याची भूमिका मांडली आहे.


हे वाचलंत का? -   येत्या ०९ जूनला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार!


त्याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी गृहमंत्री शाह यांच्याकडेही सरकारमधून बाहेर पडण्याचे आणि पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता जनतेमध्ये जाऊन पक्षाची भूमिका मांडणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांचे मत आहे.

केंद्रीय गृहमंत्री शाह यांची भेट घेण्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चा केली. दरम्यान याविषयी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची गरज नाही; असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडल्याची माहिती मिळत आहे.