आरबीआयकडून युपीआय लाईट स्वयंचलित पूर्तता करण्यास परवानगी

शक्तिकांता दास यांची माहिती

    07-Jun-2024
Total Views |

UPI Lite
 
 
मुंबई: रिझर्व्ह बँकेने युपीआय लाईटला स्वयंचलित पूर्तता करण्याची परवानगी नुकतीच दिली आहे. युपीआय लाईट हे युपीआयची (UPI) लाईट आवृत्ती आहे ज्यामध्ये ग्राहकांना छोट्या छोट्या रकमेचे व्यवहार करता येतात‌.सध्या युपीआय लाईट आवृत्तीत एकवेळी व्यवहार करण्यासाठी ५०० रुपयांची मर्यादा आहे व दिवसातून जास्तीत जास्त २००० रुपये मर्यादा कायम आहे. आता रिझर्व्ह बँकेने आपल्या पतधोरणाची परिषद सकाळी घेताना याविषयी स्पष्टता दिली आहे. याविषयी आर बीआय गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी मान्यता दिली असून आता या व्यवहाराची पूर्तता करण्याची परवानगी दिली आहे.
 
याविषयी बोलताना, 'UPI Lite चा व्यापक अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, आता ग्राहकांना त्यांच्या UPI Lite वॉलेट्सची शिल्लक त्यांच्याद्वारे निर्धारित केलेल्या मर्यादेच्या खाली गेल्यास आपोआप भरण्याची सुविधा सादर करून ते ई-आदेश फ्रेमवर्क अंतर्गत आणण्याचा प्रस्ताव आहे,' असे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास म्हणाले आहेत.यामुळे युपीआय मधील व्यवहार करणे सोपे जाणार असल्याचे शक्तिकांता दास यांनी यावेळी म्हटले आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये युपीआय लाईट बाजारात उपलब्ध झाले होते. शक्तिकांता दास यांनी रिकरिंग पेमेंटसाठी (सारख्या पेमेंट) करिता ई आदेशाची अमंलबजावणी वाढणार असल्याचे सांगितले आहे.
 
युपीआयचा व्यापक अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, आता ग्राहकांना त्यांच्या UPI Lite वॉलेट्सची शिल्लक त्यांच्याद्वारे निर्धारित केलेल्या मर्यादेच्या खाली गेल्यास आपोआप भरण्याची सुविधा सादर करून ते ई-आदेश फ्रेमवर्क अंतर्गत आणण्याचा प्रस्ताव आहे," असे गव्हर्नर म्हणाले आहेत.
 
आता फास्टॅग, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) मधील शिल्लक पुन्हा भरणे इत्यादी देयके समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे, जे निसर्गात आवर्ती (Natural Recuuring) आहेत, परंतु कोणत्याही निश्चित कालावधीशिवाय, ई-आदेश फ्रेमवर्कमध्ये, त्यांनी नमूद केले आहे.
 
हे ग्राहकांना फास्टॅग, एनसीएमसी इ. मधील शिलकी आपोआप भरून काढण्यास सक्षम करेल जर त्यांनी सेट केलेल्या उंबरठ्याच्या मर्यादेपेक्षा जास्त शिल्लक असेल. यामुळे प्रवास/मोबिलिटी-संबंधित पेमेंट करण्याची सुविधा वाढेल,' असे दास म्हणाले आहेत.