लव्ह जिहाद! बनावट ओळख सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; बळजबरीने धर्मांतरण करत गोमांस खाऊ घातलं

    07-Jun-2024
Total Views |
 LOVE JIHAD
 
लखनौ : उत्तर प्रदेशात लव्ह जिहादची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे तरुणाने बिहारमधील एका मुलीला बनावट ओळख सांगून लव्ह जिहादमध्ये अडकवले आहे. तिच्याशी प्रेमसंबंध सुरू केले आणि नंतर तिला बरेलीच्या एका दर्ग्यामध्ये आणले. तिथे तिला बळजबरीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. त्यानंतर, आरोपीने पीडितेशी निकाह केला. दरम्यान तिला गोमांस खायला दिले.
 
पीडिता गर्भवती राहिल्यांतर तिला गर्भपात करण्यासही भाग पाडण्यात आले. त्याने तिला मारहाण करून घरातून हाकलून दिले. पीडितेने आता वरिष्ठ पोलिस अधीक्षकांकडे न्यायासाठी अर्ज केला आहे. हे प्रकरण बहेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुन्नी नगर येथील आहे. गुडगाव येथे काम करत असताना आरोपीने पीडितेशी संपर्क साधला आणि राणा या नावाने आपली बनावट ओळख दिली. त्यानंतर त्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले.
 
  
रिपोर्ट्सनुसार, ती दिल्लीत भाड्याच्या घरात राहायची आणि तोही जवळच राहत होता. राणा असल्याचे सांगून त्याने तिच्याशी मैत्री केली आणि हळूहळू तिला फसवले आणि त्याच्या जाळ्यात अडकले. त्यानंतर दीड वर्षांपूर्वी तो तिला बहेरी येथील त्याच्या राहत्या घरी घेऊन गेला, तेथे तिला वास्तव समजले. मात्र, त्याने तिच्यावर दर्ग्यात इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकला आणि तिच्याशी लग्न केले. लग्नानंतर तिला मारहाण आणि अत्याचार केल्याचे महिलेने सांगितले. गर्भवती राहिल्यावर तिला बाळाचा गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले.
  
एके दिवशी आरोपीच्या भावाने तिच्या खोलीत घुसून तिच्यावर बलात्कार केला. घरी आल्यानंतर तिने पतीला सांगितल्यावर त्याने तिला तोंड बंद ठेवण्याची धमकी दिली आणि कोणाला काही सांगितल्यास पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा इशारा दिला. त्यानंतर तिने बहेरी पोलिस स्टेशन गाठले. परंतु पोलिसांनी तिचे ऐकण्याऐवजी तिला तेथून हाकलून दिल्याचा दावा केला आणि म्हणून तिने एसएसपीसमोर आपली तक्रार मांडली. पीडितेने सांगितले की तिचा जीव धोक्यात आहे आणि आरोपी तिची हत्या करु शकतो. पीडितेच्या तक्रारीनंतर एसएसपींनी योग्य तपास करून याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.