शेअर बाजार विश्लेषण: अखेरच्या सत्रात गुंतवणूकदारांनी ८ लाख कोटी कमावले सेन्सेक्स ६९२.२७ अंशाने वाढला

बँक निर्देशांकातही मोठी वाढ तर प्रायव्हेट बँक, हेल्थकेअर समभागात घसरण

    06-Jun-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात चांगली वाढ झाली आहे. अखेरच्या सत्रातही रॅली कायम राहत आजचे बाजार सकारात्मकतेने बंद झाले आहे. मोदी सरकार पुन्हा येईल हे निश्चितपणे झाल्याने व लष्करी पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर येत असल्याचे संकेत मिळाले असतानाच आर्थिक धोरणे टिकून राहतील अशी शक्यता निर्माण झाल्याने बाजारात मुख्यतः वाढ झाली आहे.
 
सेन्सेक्स निर्देशांक अखेरच्या सत्रात ६९२.२७ अंशाने वाढत ७५०७४.५१ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक २०१.०५ अंशाने वाढत २२८२१.४० पातळीवर पोहोचला आहे. दोन्ही निर्देशांकात ०.९३ व ०.८९ टक्क्यांनी वाढ झाल्याने बाजारा तील परिणाम वरच्या दिशेला गेले. बीएसई (BSE) मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये २.३१ व ३.०७ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएस ई (NSE) मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे २.२७ व ३.२२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
सेन्सेक्स बँक निर्देशांकात ३९४.०७ अंशाने वाढत ५६२२३.१२ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक २३७.३० अंशाने वाढत ४९२९१.९० पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात आज एफएमसीजी (०.३४%), फार्मा (०.२५%), हेल्थकेअर (०.०८%), प्रायव्हेट बँक (०.०३%) समभागात घसरण झाली आहे तर सर्वाधिक वाढ रिअल्टी (४.६९%),पीएसयु बँक (२.९२%), तेल गॅस (२.३७%) समभागात झाली आहे.
 
बीएसईत आज ३९४५ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील ३०११ समभाग वधारले असून ८३३ समभागात घसरण झाली आहे. त्यातील १३१ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर ४० समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. ४०२ समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर १९८ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
एनएसईत आज २७३९ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील २७३९ समभाग वधारले असून ४०५ समभागात घसरण झाली आहे. त्यातील ८३ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर २२ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. २६९ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर २५ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत वधारल्याने अखेरीस रुपयाची किंमत ८३.५३ रुपये प्रति डॉलरवर स्थिरावली होती.बीए सईतील कंपन्याचे एकूण बाजार भांडवल ४१६.१२ लाख कोटी रुपये आहे तर एनएसईतील कंपन्यांचे बाजार भांडवल ४१२.४९ लाख कोटींवर पोहोचले आहे. डॉलरच्या किंमतीत घसरण झाल्याने बाजारात रुपया वधरला होता आलबीआयने विदेशी बँकांच्या सहाय्याने डॉलरची विक्री करून रुपयाची पातळी नियंत्रित केली होती.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. विशेषतः सोन्याच्या दरात युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल या आशेने काल सोने निर्देशांकात घसरण झाली होती. परंतु युएस पे रोल आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा वाढ नोंदवली आहे. युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.१९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एमसीएक्सवरील सोने निर्देशांकात ०.३५ टक्क्यांनी वाढ होत सोने ७२७७५.०० पातळीवर पोहोचले आहे.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या (क्रूड) तेलाच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत वाढ झाली आहे. ओपेक राष्ट्रांनी २०२५ मध्ये तेल उत्पादनात कपात करण्याचे ठरवले असले तरी बाजारात पुरेसा साठा असल्याचे वातावरण तयार झाले होते परंतु तज्ञांनी यावर फूली मारत कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट झाल्याचे सांगितले होते. परिणामी बाजारात सकाळपर्यंत वाढ झाली होती. पुन्हा बाजारातील वृत्तानुसार, फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यता असल्याने मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे.सं ध्याकाळपर्यंत तेलाच्या WTI Future क्रूड निर्देशांकात ०.४९ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर Brent क्रूड निर्देशांकात ०.३६ ट क्क्यांनी वाढ झाली आहे.एमसीएक्सवरील क्रूड तेल निर्देशांकात ०.४२ टक्क्यांनी वाढ होत तेलाची पातळी ६२१६.०० प्रति बॅरेल वर पोहोचली आहे.
 
बीएसईत आज टेक महिंद्रा, एचसीएलटेक, एसबीआय, इन्फोसिस, एनटीपीसी, टीसीएस, लार्सन, भारती एअरटेल, विप्रो, टाटा स्टील, मारूती सुझुकी, जेएसडब्लू स्टील, आयटीसी, बजाज फायनान्स,पॉवर ग्रीड, कोटक महिंद्रा, टाटा मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक या समभागात वाढ झाली आहे तर एशियन पेंटस, एचयुएल, एम अँड एम, नेस्ले, इंडसइंड बँक, एक्सिस बँक, सनफार्मा या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत आज एचसीएलटेक, टेक महिंद्रा, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, एसबीआय, आयशर मोटर्स, इन्फोसिस, एनटीपीसी, अदानी एंटरप्राईज, टीसीएस, लार्सन, विप्रो, टाटा स्टील, मारूती सुझुकी, बजाज फायनान्स, ग्रासीम, आयटीसी, डॉ रेड्डीज, जेएसडब्लू स्टील, रिलायन्स, एचडीएफसी लाईफ, बजाज फिनसर्व्ह, पॉवर ग्रीड, बीपीसीएल, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसी आय बँक,टायटन कंपनी या समभागात वाढ झाली आहे तर हिंदाल्को, हिरो मोटोकॉर्प, एशियन पेंटस, नेस्ले, एम अँड एम, सिप्ला, इंडसइंड बँक, डिवीज, एक्सिस बँक, सनफार्मा, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, अदानी पोर्टस या समभागात घसरण झाली आहे.
 
आजच्या बाजारात पुन्हा मोदी सत्तेवर येणार ही भावना असल्यामुळे पुन्हा बाजारात गुंतवणूकदारांना सकारात्मक आर्थिक धोरणे पुन्हा परततील यासाठी आशा पल्लवित झाल्या आहेत. गठबंधन सरकार असले तरी मोदी सरकार मागील कार्यकाळातील धोरणे पुन्हा अंमलबजावणी करतील असा एक प्रवाह बाजारात आहे तर काही तज्ञांच्या मते सरकार एनडीए प्रणित असल्याने काही मुद्यांवर सरकारला बॅकफूटवर जावे लागू शकते. परंतु सरकार पुन्हा आल्यामुळे यांचा फायदा गुंतवणूकदारांना होण्याची चिन्हे दर्शविली जात आहेत.
 
कालप्रमाणेच आजही बाजारात रॅली झाली आहे. भारतात रिझर्व्ह बँकेने पतधोरणासाठी बैठक बोलावली असल्याने आगामी काळात व्याजदरात कपात होईल का हे पाहणे महत्वाचे ठरले आहे. दुसरीकडे अमेरिकन बाजारात सप्टेंबरमध्ये फेड व्याजदरात कपात होऊ शकते का हे अनुमान बांधले जात आहे. वास्तविकता अमेरिकन बाजारात आलेले पर्सनल कंझमशन एक्स्पेंडिचर, अथवा लेबर मार्केटची आकडेवारी अपेक्षेनुसार कमी आली आहे. युएस मध्ये आगामी काळात मंदी येईल का पुन्हामहागाई नियंत्रणात अर्थव्यवस्थेला चालना मिळेल यावरही बाजारातील पुढच्या हालचाली ठरू शकतात.
 
आज बाजारात मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये मोठी वाढ झाल्याने बाजारात वरच्या स्तराला पोहोचणे अधिक सोपे झाले. आज सकाळच्या सत्रात बीएसईचे बाजार भांडवल ४०८ लाख कोटींवरून अखेरच्या सत्रात ४१६ लाख कोटींवर पोहोचल्याने गुंतवणूकदारांना एका सत्रातच ८ लाख कोटींचा फायदा झाला आहे. दुसरीकडे युरोप सेंट्रल बँकेकडून आज व्याजदरात कपात होईल का याकडे देखील बाजाराचे लक्ष लागले आहे.
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, ' मोदी सरकार रिकवरीं मोडमध्ये आहे, एनडीएचे नंबर ३०३ झाल्याचं बातम्यात समजतंय.ही संख्या वाढल्यावर सरकारला निर्णय घेण्यात अडचणी कमी येतील व किमान बार्गेनिंग पाॅवरवर नियंत्रण राहील तसेच सरकारला स्थिरता येईल,तरच अनेक धोरणात्मक निर्णय घेता येतील किमान आर्थिक सुधारणांबाबत तरी स्वायत्तता राहील व अनेक सुधारणांबाबत विशेतः पायाभुत व संरक्षण क्षेत्रातील सुधारणांबाबत अड चण येणार नाही.
 
मागील काही दिवसांपासून फ्युचर्समध्ये विदेशी संस्थांमार्फत शाॅर्ट सेल झाल्याच्या बातम्या येत आहेत. परंतु बाजार ५ तारखेनंतर अनपेक्षितपणे सावरायला लागलाय व स्थिर होत आहे. हे ज्या विदेशी संस्थांमार्फत विक्री करत होते व निकालाच्या घोषणेजवळ शाॅर्ट करत आहेत त्यांना येणार्‍यां निकालाची पुर्ण कल्पना असावी.परंतु परत एकदा मोदी सरकारच स्थापन होत असल्याने बाजार वाढत आहे, व शाॅर्ट सेलवाले बाजारात ट्रॅप होत जात आहेत व त्यामुळेही बाजार वाढत आहे.
 
अशा परिस्थितीत अडानी ग्रुप चे २०२३ मधील जानेवारीत झालेल्या शाॅर्ट सेलची आठवण आली.व विदेशातून केलेले कटकारस्थानची आठवण ताजी झाली. असो आज आपल्या देशातील म्युच्युअल फंडांचे गुंतवणूकदारांच्या व देशातील आर्थिक संस्थांमार्फत बाजाराला असलेला भक्कम पाठिंबा पहाता व भारतीय जीडीपी ८.२ टक्के पहाता नवनवीन विकासाचे उच्चांक आपण नक्कीच अपेक्षा करू शकतो.आज सर्व क्षेत्रात तेजी पहायला मिळाली.टेक्नोलॉजी, मेटल, खाजगी, सरकारी बॅक,विशेषतः डिफेन्स चे सरकरी व खाजगी शेअर्स यात वाढ पहायला मिळाली.'
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, 'भारतीय जनता पक्ष स्वबळावर बहुमत मिळवण्यात अयशस्वी ठरल्याच्या सुरुवातीच्या चिंतेवर मात करून - आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार चालू ठेवण्यावर नूतनीकरण केलेल्या आत्मविश्वासावर भारताच्या शेअर बाजारांनी निवडणूक निकालांच्या धक्क्यातून झटका दिला आहे.
 
४ जूनच्या मतमोजणीनंतर 6 टक्क्यांच्या घसरणीनंतर बेंचमार्क निर्देशांकांमध्ये झालेल्या तीव्र वाढीवरून हे स्पष्ट होते. NSE निफ्टी ५० ने ५ जून रोजी ३.४ टक्क्यांपर्यंत उडी मारली आणि ६ जून रोजी आणखी १.२ टक्क्यांनी वाढ केली आणि इंट्राडे २२९० पॉइंट्स वर पोहोचला.रेल्वे विकास निगम (RVNL) च्या शेअरची किंमत 6 जूनच्या सुरुवातीच्या व्यापारात ७ टक्क्यांनी वाढली जेव्हा कंपनीने ३९० कोटी रुपयांचा करार केला.कंपनीला पूर्व रेल्वेच्या आसनसोल विभागांतर्गत सीतारामपूर बायपास लाइनच्या बांधकामासाठी पूर्व रेल्वेकडून स्वीकृती पत्र प्राप्त झाले आहे," कंपनीने आपल्या प्रकाशनात म्हटले आहे. प्रकल्पाची किंमत ३९०.९७ व ३५२७६.५५ रुपये आहे आणि ती २४ महिन्यांत पूर्ण केली जाईल.
 
तसेच, DHBVN (दक्षिण हरियाणा बिजली वितरण निगम) मधील गुरुग्राम सुधारित वितरण क्षेत्र योजना (RDSS) मध्ये SCADA आणि DMS/OMS कामांच्या अंमलबजावणीसाठी दक्षिण हरियाणा बिजली वितरण निगम लिमिटेडकडून सर्वात कमी बोली लावणारी कंपनी म्हणून उदयास आली. कामाची किंमत 124,36,80,301.57 असून ते 30 महिन्यांत पूर्ण होणार आहे.अलीकडील अद्यतनांमध्ये, ITC च्या भागधारकांनी ९९.६ % बहुमताने त्यांच्या हॉटेल व्यवसायाच्या विलगीकरणास मान्यता दिली आहे. स्टॉक १% वाढला.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना, जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले, 'बेंचमार्क निर्देशांकांनी त्यांची सकारात्मक गती कायम ठेवली, कारण नवीन युती शपथ घेणार आहे, जे एक स्थिर सरकार असेल असा अंदाज आहे. तथापि, नवीन मंत्रिमंडळाच्या स्थापनेबद्दल चिंता कायम आहे आणि आगामी काळात धोरणात्मक उपाय योजना जाहीर केल्या जातील.अर्थसंकल्पदरम्यान, बाजार तरलतेवर आरबीआयच्या टिप्पण्यांमधून नवीन संकेतांची वाट पाहत आहे.'
 
आजच्या बाजारावर प्रतिक्रिया देताना कोटक सिक्युरिटीजचे हेड इक्विटी रिसर्च श्रीकांत चौहान म्हणाले, ' बेंचमार्क निर्देशांकांनी सलग दुसऱ्या दिवशी सकारात्मक गती कायम ठेवली, निफ्टी २०१ अंकांनी वाढला तर सेन्सेक्स ६९२ अंकांनी वर गेला. क्षेत्रांमध्ये, रिॲलिटी इंडेक्स सर्वाधिक वाढला, ४.६९ टक्के वाढला तर निवडक हेल्थकेअर आणि एफएमसीजी समभागांनी उच्च पातळीवर इंट्राडे प्रॉफिट बुकींग पाहिली.तांत्रिकदृष्ट्या, संपूर्ण दिवस उघडल्यानंतर बाजार २२६५० ते २२९००/७४४७५-७५२९० या पातळीवर फिरला. तथापि, इंट्राडे चार्ट्सवर मार्केट अजूनही अपट्रेंड कंटिन्युएशन फॉर्मेशन धारण करत आहे, जे मोठ्या प्रमाणावर सकारात्मक आहे. आमचे मत आहे की, निर्देशांकाने पुलबॅक रॅलीचा एक टप्पा पूर्ण केला आहे आणि आम्ही उच्च स्तरावर काही नफा बुकिंग पाहू शकतो.
 
आता दिवसाच्या व्यापाऱ्यांसाठी, २२६५०/७४४७५ एक प्रमुख समर्थन स्तर म्हणून काम करेल. जोपर्यंत बाजार समान वर व्यवहार करत आहे तोपर्यंत सकारात्मक भावना कायम राहण्याची शक्यता आहे. वरच्या बाजूला, निर्देशांक २२९००- २३०००/७५२९०-७५५००वर प्रतिकार शोधू शकतो. दुसऱ्या बाजूला,२२६५० /७४४७५ खाली अपट्रेंड असुरक्षित असेल. त्याच खाली, व्यापारी ट्रेडिंग लाँग पोझिशनमधून बाहेर पडणे पसंत करू शकतात.'
 
बाजार परिस्थितीविषयी प्रतिक्रिया देताना रेलिगेअर ब्रोकिंगचे एसव्हीपी रिसर्च अजित मिश्रा म्हणाले, 'बुधवारच्या रिबाऊंड चालू ठेवून, बाजार जवळजवळ अर्धा टक्का वाढून, उंचावर गेला. सुरुवातीच्या वाढीनंतर, निफ्टी एका मर्यादेत फिरला आणि शेवटी २२८२१.४० स्तरांवर स्थिरावला. रिॲल्टी, आयटी आणि तेल आणि वायूसह सर्वाधिक क्षेत्रे या ट्रेंडसह समक्रमित झाली. विस्तृत निर्देशांकांनी बेंचमार्कपेक्षा जास्त कामगिरी केली, २%-३% दरम्यान वाढ झाली.'
 
अलीकडच्या निवडणूक निकालांशी बाजार जुळवून घेत असल्याचे दिसून येते आणि जागतिक आघाडीवर स्थिरता सकारात्मकतेला चालना देत आहे. अलीकडील रिबाऊंडनंतर निर्देशांकात थोडा श्वास येऊ शकतो, परंतु एकूणच टोन सकारा त्मक राहण्याची शक्यता आहे. सर्व प्रमुख क्षेत्रांनी या हालचालीत भाग घेतल्याने, आम्ही पुलबॅक दरम्यान दर्जेदार नावांवर लक्ष केंद्रित करून 'बाय ऑन डिप्स' दृष्टीकोन राखण्याचा सल्ला देतो.'