नारायण राणे राज ठाकरेंच्या भेटीला!

    06-Jun-2024
Total Views |
 
Narayan Rane
 
मुंबई : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गुरुवारी भेट घेतली आहे. लोकसभेत मिळालेल्या विजयाकरिता राज ठाकरेंचे आभार मानन्यासाठी त्यांनी ही भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी आमदार नितेश राणेदेखील उपस्थित होते. 
 
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात यंदा नारायण राणेंनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली. दरम्यान, या निवडणूकीसाठी त्यांनी जोरदार प्रचारही केला होता. मनसेने महायूतीला बिनशर्त पाठींबा जाहीर केल्यानंतर नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी कोकणात सभा घेतली होती. या सभेचाही राणेंच्या विजयात मोठा वाटा असल्याने याबाबत आभार मानन्यासाठी त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
 
हे वाचलंत का? -  "उद्धवजी, भाजप ४५ च्या वर गेली! सन्यास घेणार का?"
 
उबाठा गटाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून दोन टर्म खासदार असलेल्या विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर त्यांच्याविरोधात भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे मैदानात होते. या निवडणूकीत नारायण राणेंनी ४ लाख ४८ हजार ५१४ मतं घेत दणदणीत विजय मिळवलाय. तर विनायक राऊतांना ४ लाख ६५६ मतं मिळाली आहेत. म्हणजेच नारायण राणेंनी तब्बल ४७ हजार ८५८ मताधिक्याने लीड घेत विनायक राऊतांना म्हणजे एकप्रकारे उद्धव ठाकरेंना पराभूत केलं.