ठरल ! ओला इलेक्ट्रिक ठरणार आयपीओ आणणारी पहिली इवी कंपनी !

सेबीकडून आगामी ओला इलेक्ट्रिक आयपीओला मान्यता

    11-Jun-2024
Total Views | 33

ola electric
 
 
मुंबई: बंगळूरची प्रसिध्द इवी (Electric Vehicle) कंपनी ओला इलेक्ट्रिकने आपला आयपीओ आणण्याचे ठरवले आहे. तसे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिल्याने लवकरच ओला इलेक्ट्रिक आयपीओ येण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः हा आयपीओ आल्यास आय पीओ (IPO) आणणारी ईवी कंपनी ओला इलेक्ट्रिक ठरू शकते.
 
आयपीओसाठी कंपनीने सेबीकडे परवानगी अर्ज दाखल केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रस्तावाला सेबीने मान्यता दिली आहे. त्यामुळे आगामी काळात आयपीओसाठी कंपनी इतर प्रकिया पूर्ण करण्याची शक्यता आहे. कंपनीने संस्थापक भाविश अग्रवाल यां नी आपल्या कर्मचाऱ्यांना यासंबंधी माहिती दिली होती.
 
कंपनीने २२ डिसेंबरला सेबीकडे ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रोसपेक्स्टस (Draft Red Herring Prospectus) भरला आहे. कंपनी ५००० कोटींचे फ्रेश इश्यू आयपीओसाठी बाजारात उपलब्ध करू शकते. तसेच कंपनीकडून ऑफर फॉर सेल (OFS) साठी ९५.२ दशलक्ष शेअर्स बाजारात आणू शकते. याबाबत कंपनीने कुठलेही अधिकृत भाष्य केलेले नाही.
 
अग्रलेख
जरुर वाचा
देवेंद्र फडणवीस : विकासाच्या दूरदृष्टीसह सुशासनाचा आदर्श घालून देणारे व्यक्तिमत्त्व

देवेंद्र फडणवीस : विकासाच्या दूरदृष्टीसह सुशासनाचा आदर्श घालून देणारे व्यक्तिमत्त्व

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला 2047 सालापर्यंत ङ्गविकसित राष्ट्रफ निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या राष्ट्रनिर्माणाच्या ऐतिहासिक प्रक्रियेत महाराष्ट्राचे अमूल्य योगदान असेल, यात मला कोणतीही शंका नाही. लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात महाराष्ट्राचे नेतृत्व असल्यानेच हे शक्य होणार आहे. फडणवीस यांच्या सर्वसमावेशक भूमिकेमुळेच राज्याचे ट्रिलियन डॉलर्स इकोनॉमीचे स्वप्न मूर्त स्वरूपात जनतेला पाहायला मिळणार आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121