केरळच्या विकासासाठी वचनबद्ध

सुरेश गोपी यांचा खुलासा; मंत्रिपद सोडण्याबाबत अफवा

    11-Jun-2024
Total Views | 31

सुरेश गोपी
 
नवी दिल्ली :- केंद्र सरकारचा शपथविधी सोहळा 9 जून रोजी पार पडला. यामध्ये केरळमधील भाजपचे एकमेव खासदार सुरेश गोपी यांनीदेखील केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, शपथविधीनंतर अचानक सुरेश गोपी मंत्रिपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली. विविध वृत्त वाहिन्यांमध्येही ही बातमी आली. दरम्यान, आता त्यांनी या सर्व वृत्तांचे खंडन केले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच केरळमध्ये कमळ फुलले. भाजप नेते सुरेश गोपी यांनी त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवला. या विजयानंतर त्यांची मंत्रिपदीवर्णी लागली.
 
मात्र, आता त्यांनी अशा सर्व बातम्यांचे खंडन केले आहे. त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की, काही मीडिया प्लॅटफॉर्म चुकीच्या बातम्या पसरवत आहेत की, मी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देत आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. केरळच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी वचनबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121