एमएचटी सीईटीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

    10-Jun-2024
Total Views | 69
 CET
मुंबई :अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी दि.22 एप्रिल ते दि.16 मेदरम्यान ‘राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा’कडून (सीईटी कक्ष) प्रवेश परीक्षा घेण्यात आली. मात्र, परीक्षेच्या निकालाबाबत सीईटी कक्षाकडून वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
 
‘राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा’कडून पीसीबी ग्रुपची सीईटी परीक्षा दि. 22 ते दि. 30 एप्रिल, तर पीसीएम ग्रुपची परीक्षा दि. 2 मे ते दि. 16 मे या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे तत्कालीन आयुक्तांकडून जाहीर करण्यात आले होते.
 
मात्र, त्यानंतर सीईटी कक्षाकडून निकालाची संभाव्य तारिख जाहीर करण्यात आली. त्यात एमएचटी सीईटीच्या (पीसीएम आणि पीसीबी ग्रुप) निकालाची संभाव्य तारिख दि. 10 जून अशी जाहीर करण्यात आली होती. परंतु, सीईटी कक्षाने एमएचटी सीईटीचा निकाल हा दि. 19 जून किंवा त्यापूर्वी जाहीर करणार असल्याचे संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. सीईटी कक्षाकडून तारखांवर तारखा जाहीर करण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121