शेअर बाजार विश्लेषण: युएस महागाई दर आकडेवारीनंतर बाजारात जान ! सेन्सेक्स ६७६.६९ व निफ्टी २०३.३० अंशाने उसळला

मिडकॅप व स्मॉलकॅपमचा बोलबाला कायम ! पीएसयु बँक निर्देशांकात घसरण बाकी समभागात वाढ

    16-May-2024
Total Views |

Stock
 
 
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. अमेरिकन बाजारातील महागाई दराची आकडेवारी आल्यानंतर बाजारात रॅली झाली आहे. मोठ्या प्रमाणात आज बाजारात वाढ झाली आहे. मुख्यतः अखेरच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात आकडेवारी वाढल्यानंतर निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स निर्देशांक ६७६.६९ अंशाने वाढत ७३६६३.७२ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी निर्देशांक २०३.३० अंशाने वाढत २२४०३.८५ पातळीवर पोहोचला आहे.
 
सेन्सेक्स बँक निर्देशांक ३३०.३१ अंशाने वाढ होत ५४८०३.१७ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक २८९.६० अंशाने वाढ होत ४७९७७.०५ पातळीवर पोहोचला आहे. आज बीएसईत (BSE) मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे वाढ १.०७ व ०.८५ टक्क्याने वाढ झाली आहे तर एनएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.८८ व ०.८४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
एनएसईतील क्षेत्रीय निर्देशांकात पीएसयु बँक (०.८८%) वगळता इतर सर्व निर्देशांकात वाढ झाली. सर्वाधिक वाढ कनज्यूमर ड्युरेबल्स (१.७२%) आयटी (१.६६%), रियल्टी (१.६३%) एफएमसीजी (०.८१%) या समभागात झाली आहे.
 
बीएसईत आज एकूण ३९५२ कंपन्याचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील एकूण २०४० समभागात वाढ झाली आहे तर १७९८ समभागात आज घसरण झाली आहे.त्यातील १९३ समभागा मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर ३० समभाग मूल्यांकनात ५२ आठवड्यातील आज सर्वाधिक घसरण झाली आहे. आज एकही समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिलेला नसून १ समभाग लोअर सर्किटवर कायम राहिला आहे.
 
एनएसईत आज एकूण २७०९ कंपन्याचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १५३१ समभागात वधारले असून १०७२ समभागात वाढ झाली आहे. १०७२ समभागात आज घसरण झाली आहे.त्यातील ११५ समभागाचे मूल्यांकन ५२ आठवड्यातील सर्वाधिक राहिले असून १४ कंपन्यांच्या मूल्यांकनात आज सर्वाधिक घसरण झाली आहे. त्यातील एकूण १४० समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ५६ समभाग आज लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
आज सकाळी युएस महागाई दर आकडेवारी आल्यानंतर बाजारात सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली होती. महिन्यातील सर्वाधिक वाढ आज सोन्याच्या दरात झाली होती सोने आज प्रति १० ग्रॅम ७०० ते ७५० रुपयांनी सराफा बाजारात वाढले होते. संध्याकाळपर्यंत मात्र युएस फ्युचर गोल्ड निर्देशांकात घट झाल्याने सोन्याचे आंतरराष्ट्रीय दर स्थिरावले होते.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील महागाई दर आकडेवारी आल्यानंतर कच्च्या तेलाचे (क्रूडचे ) दर महागले आहेत. महागाई नियंत्रणात आल्यानंतर तेलाच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाल्याने तसेच संध्याकाळपर्यंत क्रूड तेलाच्या साठ्यात घट झाल्याने बाजारात तेलाची टंचाई निर्माण झाली होती.अखेर WTI Future क्रूड निर्देशांकात ०.८३ टक्क्यांनी व Brent क्रूड निर्देशांकात ०.७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील एमसीएक्स निर्देशांकात ०.८९ टक्क्यांनी वाढ होत क्रूड ६५९३ रुपये प्रति बॅरेलवर पोहोचले आहे.
 
बीएसईतील कंपन्याचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ४०७.३५ लाख कोटी होते तर एनएसईतील कंपन्याचे बाजार भांडवल एकूण ४०३.७६ लाख कोटी होते. कालपर्यंत बाजारात ७७६.४९ कोटींची गुंतवणूक परदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतली होती.
 
आज अमेरिकेतील तीनही शेअर बाजार S& P 500, DOW Jones, NASDAQ शेअर बाजार तेजीत राहिले आहेत तर संध्याकाळपर्यंत युरोपातील तिन्ही बाजार FTSE 100, DAX, CAC 40 घसरण झाली आहे तर आशियाई बाजारातील NIIKEI,HANG SENG, SHANGHAI या तिन्ही बाजारात वाढ झाली होती.
 
बीएसईत आज एम अँड एम, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, इन्फोसिस, टायटन कंपनी, जेएसडब्लू स्टील, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, लार्सन, विप्रो, कोटक महिंद्रा, एक्सिस बँक, एचसीएलटेक,अल्ट्राटेक सिमेंट, एचयुएल, आयटीसी, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, सनफार्मा, एशियन पेंटस, नेस्ले , एनटीपीसी या समभागात वाढ झाली आहे तर मारूती सुझुकी, टाटा मोटर्स, एसबीआय, पॉवर ग्रीड, इंडसइंड बँक या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत आज एम अँड एम, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, इन्फोसिस, टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचडीएफसी लाईफ, टायटन कंपनी, बजाज फिनसर्व्ह, हिरो मोटोकॉर्प, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, ओएनजीसी, एचडीएफसी बँक, ब्रिटानिया, लार्सन, अपोलो हॉस्पिटल, एचसीएलटेक, सिप्ला, बजाज फायनान्स, एक्सिस बँक,अल्ट्राटेक सिमेंट, एचयुएल, आयटीसी, श्रीराम फायनान्स, आयशर मोटर्स, रिलायन्स, सनफार्मा, अदानी पोर्टस, टीसीएस, नेस्ले, ग्रासीम, एशियन पेंटस या समभागात वाढ झाली असून मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, एसबीआय, बीपीसीएल,पॉवर ग्रीड, इंडसइंड बँक, डॉ रेड्डीज, बजाज ऑटो, अदानी एंटरप्राईज, हिंदाल्को या समभागात घसरण झाली आहे.
 
आज जागतिक पातळीवर युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तवली गेल्याने बाजारात मंदीची वावटळ उठली. विशेषतः बाजारातील महागाई दर घटल्यानंतर परदेशी गुंतवणूकदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला परिणामी अमेरिकन बाजारातील महागाई कमी झाल्याने बाजारात सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मार्च महिन्यातील तुलनेत ३.५ मधील तुलनेत ३.४ वर महागाई दर आल्याने भारतीय बाजारात त्याचा परिणाम दिसून आला. देशांतर्गत गुंतवणूकदारांमध्ये भारतीय रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल का याची चाचपणी सुरू झाल्याने भारतीय शेअर बाजार तेजीत गेले आहे.
 
याशिवाय ब्लूमबर्गच्या अहवालातील माहितीनुसार डॉलर महिन्यातील सर्वाधिक पातळीवर घसरल्याने त्याचा मोठा फरक भारतीय बाजारात दिसून आला.डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत वधारल्याने बाजारात त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे.बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ८३.५३ रुपयांवर स्थिरावली होती.
 
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, 'काल अमेरिकेतील Consumer price index घोषित झाला हा निर्देशांक एक सरासरी आहे. फार चांगला फार वाईट असा काही वाटत नाही.पण अमेरिकेतील शेअर बाजारात त्याचे स्वागत केलेले दिसत आहे. फेड रिझर्व्ह व्याजदर कपातीकडे लक्ष ठेऊन तो बाजारात सकारात्मक दिसत आहे. नोव्हेंबरमध्ये निवडणूकीपूर्वी व्याजदर कमी होणे अमेरिकेतील उद्योजकांना अपेक्षित आहे. २२०४ मध्ये फेडने तीन वेळा व्याजदर कपात घोषित केलेली आहे. एक किंवा दोन वेळा ही कपात कमी होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत बरेच सोपस्कार बाकी आहेत.
 
आज आपल्या बाजारात शेवटच्या तासाभरात बाजारात तेजी पहायला मिळाली. ६७५ पाॅईंट ची तेजी पहायला मिळाली. हिंदुस्तान एरोनाॅटीकस १०% वर गेला. एचडीएफसी बँक, रिलायन्स यांच्यातील तेजीमूळे वाढ दिसली. अमेरिकेतील बाजारातील उत्साह हा आपल्या बाजारातही पहायला मिळतोय.एकंदरीत पूढील जूनमधील निवडणूक निकाल व त्यानंतर फेड लागोपाठ जून जूलै महिन्यात बाजारात चैतन्य नक्कीच ठेऊ शकतात.
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले, 'देशांतर्गत बाजारपेठेत उशीरा वाढीचा अनुभव आला, मजबूत जागतिक ट्रेंडमुळे, ज्याने यूएस ग्राहक चलनवाढीच्या अपेक्षेपेक्षा कमी आकड्याकडे लक्ष वेधले, जे २०२४ मध्ये किमान दोन व्याजदर कपात सुचवते. पुढे, निर्यातीत वाढ होऊनही व्यापक बाजारपेठेत तेजी कायम आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता, बँकिंग, आयटी आणि उद्योग यासारख्या दिग्गजांच्या क्षेत्रांना मागे टाकत आहे.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी प्रतिक्रिया देताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव रिसर्च निरज शर्मा म्हणाले, ' मजबूत जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक गुरुवारी उच्च पातळीवर सुरू झाले. शिवाय, निफ्टी सकारात्मकपणे उघडला, जोरदार अस्थिरता दर्शविली, परंतु तरीही, निर्देशांक २२४०४ स्तरांवर सकारात्मक नोटवर बंद करण्यात यशस्वी झाला.२१.११ च्या उच्च पातळीची चाचणी घेतल्यानंतर अस्थिरता निर्देशांक इंडिया VIX २% ने घसरला.तांत्रिकदृष्ट्या, निर्देशांकाने २२३१० चा अडथळा ओलांडला आहे,जिथे २१ दिवसांची एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग एव्हरेज (21-DEMA) ठेवण्यात आली होती, आणि त्याच्या वर बंद होण्यात यशस्वी झाला, शक्ती दर्शवते.अशाप्रकारे, सध्याची रॅली २२५०० -२२६०० पातळीची चाचणी घेऊ शकते.
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना, बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले,'आजच्या व्यापारात सेन्सेक्स आणि निफ्टी-50 हे दिवसाच्या नीचांकी स्तरावरून घट्टपणे सावरत एका तुटपुंज्या सत्रात जवळपास 1% वर बंद झाले. निफ्टी-५० ने साप्ताहिक एक्स्पायरी सत्राच्या शेवटच्या अर्ध्या तासात मोठी वाढ दर्शविली. बँकिंग आणि आयटी समभागांनी वाढ केली तर पॉवर समभागांमध्ये घसरण झाली. सुमारे २०४९ शेअर्स वाढले, १६४० शेअर्समध्ये घट झाली, ११६ शेअर्स अपरिवर्तित राहिले.यूएस सीपीआय डेटाने फेड सप्टेंबरच्या दर कपातीची आशा निर्माण केल्यामुळे आयटी समभागांनी २ महिन्यांत सर्वात मोठी वाढ नोंदवली.
 
यूएस चलनवाढ प्रिंट एप्रिलमध्ये ०.३% ने वाढली,अंदाजे ०.४% स्पाइकपेक्षा कमी. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप इंडेक्स प्रत्येकी १% पेक्षा जास्त वाढल्याने ब्रॉडर मार्केटने देखील समान वाढ नोंदवली. नैरृत्य मोसमी वारे केरळमध्ये ३१ मेच्या आसपास, नेहमीपेक्षा एक दिवस आधी पोहोचण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मजबूत Q4FY24 निकालानंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स ११% वाढला.त्याच्या महसुलात १८.२ % वार्षिक वाढ झाली आहे तर PAT ५१.१% ने वाढली आहे. EBITDA मार्जिन एका वर्षापूर्वी २६% च्या तुलनेत ३९.९% वर सुधारला आहे.
 
मध्य प्रदेशातील महान ते छत्तीसगडमधील सिपत पूलिंग सबस्टेशनला जोडणाऱ्या ४०० kV ट्रान्समिशन लाइनवर पूर्ण नियंत्रण मिळवून अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडने एस्सार ट्रान्सको लिमिटेडचे १९०० मध्ये अधिग्रहण केले आहे. जेएम फायनान्शिअलने सोमानी सिरॅमिक्सवर बाय रेटिंग कायम ठेवले आहे आणि त्याची लक्ष्य किंमत ५१% ने वाढवून ९५० प्रति शेअर केली आहे.Q4FY24 साठी सोमानी सिरॅमिक्सचा महसूल अपेक्षेनुसार पूर्ण झाला, तर अपेक्षेपेक्षा कमी खर्चामुळे EBITDA ५% वाढला.'
 
आजच्या सोन्याच्या दरातील हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे कमोडिटी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, 'काल ७२२५० ते ७३२५० पर्यंत मजबूत रॅली पाहिल्यानंतर सोन्याच्या किमती स्थिर राहिल्या, ७३००० च्या आसपास घट्ट मर्यादेत व्यवहार होत आहेत. ही स्थिरता यूएस मध्ये अपेक्षेपेक्षा कमी सीपीआयचे अनुसरण करते, ज्यामुळे महागाईचा दबाव कमी होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या किमती एकंदरीत सकारात्मक स्थिती राखत असताना, काही किरकोळ नफा बुकिंग उच्च स्तरांवरून होऊ शकते, विशेषत: अपेक्षित CPI इव्हेंटद्वारे चालविलेल्या खरेदीची किंमत वाढलेली दिसते.'