'फुलेरा'गावात निवडणूकीचे वारे; कोण होणार नवा प्रधान? 'पंचायत ३' चा ट्रेलर पाहाच

    15-May-2024
Total Views | 48
 
panchyat
 
मुंबई : बहुप्रतिक्षित ‘पंचायत’ (Panchayat 3) ही वेब सीरीज सध्या महत्वपुर्ण वळणाला आली आहे. शिवाय 'पंचायत ३' (Panchayat 3) ही यावर्षीत भारतातील बहुप्रतिक्षित वेबसिरीज म्हणून ओळखली जात आहे. या सीरीजच्या दोन्ही भागांनी लोकप्रियता तर मिळवलीच शिवाय प्रत्येत कलाकाराने देखील दमदार अभिनय कौशल्य दाखवले. अशातच नुकताच 'पंचायत ३' चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये फुलेरा गावात निवडणुकीचं वातावरण पाहायला मिळत आहे. यात भूषण आणि प्रधानजी यांच्यात निवडणुक रंगणार असं दिसत आहे.
 
'पंचायत ३'च्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, अभिषेक त्रिपाठी फुलेरा गावचा सचिवजी बनून गावात येतो. त्याची आणि रिंकीची मैत्री वाढताना दिसते. पुढे फुलेरामध्ये पंचायतच्या निवडणुकांचं वातावरण चांगलंच तापलेलं असतं. दरम्यान, या निवडणुकीत प्रधानजींची पत्नी मंजू देवी आणि बनराकस म्हणजेच भूषण पंचायतच्या निवडणुकीला उभे राहतात. भूषण विरुद्ध मंजू देवी ही निवडणुकीची लढत बघायला मिळते. पुढे आधीच्या सीझनमध्ये ज्या विधायकाला फुलेरामधून हाकलवण्यात आलं, त्याच्याकडे शांती प्रस्ताव घेऊन जाण्याची गोष्ट पुढे येते. पुढे काय होणार हे आता 'पंचायत ३' मध्ये पाहायला मिळणार आहे. येत्या २८ मे २०२४ रोजी 'पंचायत ३' प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचं टार्गेटिंग असून त्यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. फक्त संबंध असल्याचा अर्थ हा गुन्हा केला असे होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी काही गैर केले असे होत नाही. माझा खडसेंना सल्ला आहे,तुम्ही सतत गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नसल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121