शिट्टी फक्त वाजवण्यासाठी असते, लोकसभेत पाठवण्यासाठी नाही: पालकमंत्री रवींद्र चव्हाण

    14-May-2024
Total Views |
Ravindra Chavan on Bahujan Vikas Aghadi

पालघर
: देशाच्या संविधानाचा पाया कुणालाही मुळीच बदलता येणार नाही, याबद्दल दुमत नाही आणि बदलाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु विरोधक याचा अपप्रचार करीत आहेत आणि बऱ्यापैकी ते लोकांमध्ये भ्रम निर्माण करीत आहेत. यासाठी आम्ही लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहोत, हा विरोधकांचा विखारी प्रचार सुरू आहे असे वक्तव्य राज्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. रवींद्र चव्हाण यांनी आज मंगळवार १४ मे रोजी दुपारी रिजन्सी बँक्वेट हॉल, नालासोपारा (पूर्व) येथे पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, इथेनॉल मुळे ४०% खर्चाची बचत झाली. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडून एक कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे काम सरकार करू शकले.
 
हे सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे. महिला व पुरुष मदतनिसांचे, पोलीस पाटील इत्यादींचे मानधन या सरकारने वाढवले. त्या आधीच्या सरकारकडून लोकहिताचे निर्णय झाले नाहीत. २६ हजार मच्छीमारांची सुटका करण्याचे काम राज्य व केंद्र सरकारने केले. सरकारने सर्वांसाठी चांगले धोरण तयार करून काम केले आहे. वसई विरारची पाण्याची, गटार नाल्यांची समस्या सोडवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने हजारो कोटी रुपये मंजुरी करून घेतले. स्थानिक स्तरावर हे काम सुद्धा भाजप व शिंदे सरकार करणार आहे असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे एका दिवसात ३८ किलोमीटरचे रस्ते तयार होत आहेत. मोदींचे काम खूप चांगले आहे. रोरो सर्विस, जल जीवनचे काम प्रगतीपथावर आहे. रेल्वेचे जाळे देशभरात विणण्याचे व पसरवण्याचे काम मोदी सरकार करत आहे. जगातले सर्वात स्वस्त इंटरनेट सेवा मोदी सरकार देत आहे. अर्थव्यवस्थेत अमुलाग्र बदल होताना दिसतात ते म्हणजे फक्त पारदर्शकतेमुळेच. आज प्रति सेकंदाला ४८३० ऑनलाईन एका सेकंदाला ट्रांजेक्शन होत आहे, हे मोदी सरकारमुळेच हे विसरता येणार नाही.
 
आपल्या शेतीप्रधान देशात ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिले जात आहे. त्याचे कारण म्हणजे कोठारांअभावी धान्याची नासाडी होत होती. मात्र आता कोठारे मोठ्या प्रमाणात उभारली आहेत. त्याची क्षमता वाढवली आहे असे ते म्हणाले. येणाऱ्या काळात देशातला एकही माणूस उपाशी राहणार नाही. १.७४ कोटी क्षेत्रात कुशल कामगारांना कामे मिळाले. देशासाठी वेगळे विजन व धारणा असणे गरजेचे आहे. शेजारी देश आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहत होते? त्याचे कारण म्हणजे झिरो टोलारन्स होय. हे चित्र बदलण्याचे काम मोदी सरकारने केले. कॅन्सर मुक्त भारताची घोषण पंतप्रधान मोदी यांनी केली आहे आणि त्या दृष्टीने भगीरथ प्रयत्न सुरू आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून नाहक कुणाचा बळी जाऊ नये, त्या व्यक्तीला आपल्याच जिल्ह्यात सुविधा मिळावी. सर्वत्र शंभर शंभर खाटांचे हॉस्पिटल बनवा असे आदेश मोदी सरकारने दिले आहेत. जनतेला वेळेवर व योग्य उपचार व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
 
आज सर्वात जास्त पेटंट आपल्या देशात निर्माण होतात, याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. वाढवण बंदराचा विचार बाळासाहेबांपासून सुरू होता. विरोधक अपप्रचार करतात. यामध्ये स्थानिक लोकांच्या भावनेचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले. स्थानिक मुद्दे लोकसभेला महत्त्वाचे नाहीत. शिट्टी फक्त वाजवण्यासाठी असते, लोकसभेत पाठवण्यासाठी असू शकत नाही असा टोला त्यांनी बहुजन विकास आघाडीला लगावला. ते म्हणाले ही निवडणूक गल्लीतली नाही, तर दिल्लीतली आहे, हे मतदारांनी समजून घ्यावे. देशाची सुरक्षा करण्याचे काम एका बहुजन विकास आघाडीला शक्य नाही असे ते म्हणाले. योग्य उमेदवाराला मतदान करा, चुकीच्या व्यक्तीला नको असे आवाहन त्यांनी केले. देशाला योग्य दिशेने नेण्यासाठी पत्रकारांचे योगदान मोलाचे असल्याचे ते म्हणाले. विजेला पर्याय म्हणून मोदी सरकारने जनतेला विज निर्मिती करा, वापर आणि उर्वरित वीज सरकारला विका हे धोरण स्वीकारले. त्यामुळे लोकांचा त्रास कमी होत असून उत्पन्न सुद्धा मिळणार आहे.