शहानिशा होण्यापूर्वी मसाला कंपन्यांनी इथिलिन ऑक्साईडचा वापर केल्याचा दावा फेटाळला

युएस रेग्युलेटरी आकडेवारीनुसार या नाकारलेल्या शिपमेंटमध्ये आतापर्यंत १४.५ टक्क्यांनी वाढ झाली

    13-May-2024
Total Views |

Spices
 
 
मुंबई: भारतीय मसाला कंपन्यांच्या युएसमधील शिपमेंट (निर्यात)अतिरिक्त हानिकारक पदार्थांचा वापर व कथित दूषित भेसळीच्या आरोपांमुळे नाकारल्या गेल्या आहेत. २०२१ पासून सातत्याने या भारतातील मसाल्याची निर्यात युएसमध्ये रोखल्या गेल्या होत्या. यामध्ये युएस रेग्युलेटरी आकडेवारीनुसार या नाकारलेल्या शिपमेंटमध्ये आतापर्यंत १४.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हाँगकाँगनेही मागच्या महिन्यात एमडीएच व एव्हरेस्ट या भारतीय मसाल्याच्या विक्रीवर बंदी घातली होती.
 
या मसाल्यातील हानिकारक पदार्थांमुळे कर्करोग होण्याची शक्यता वर्तवली गेल्याने त्या देशातील मसाला नियामक मंडळाने या विक्रीवर बंदी घातली होती. 'इथिलीन ऑक्साइड' या मसाल्यातील अतिमिश्रित पदार्थाने कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते असे परदेशी मसाला नियामक मंडळाने सांगितले होते.
 
इथिलिन ऑक्साईड या पदार्थांचा वापर भारतीय मसाल्यात जास्त असल्याचा दावा हाँगकाँग, सिंगापूर, युएस येथील मंडळाने दावा केला होता. मात्र एमडीएच, एव्हरेस्ट या दोन कंपन्यांनी या पदार्थांचा वापर आपल्या मसाल्यात वापर केल्याचा दावा फेटाळून लावला आहे. कंपनींनी यात आपलं इथिलिन ऑक्साईडचा वापर केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. याविषयी पुन्हा शहानिशा करण्यासाठी भारत, युएस,ऑस्ट्रेलिया या देशातील नियामक मंडळानी चौकशी सुरु केली आहे.
 
भारत हा जगातील सर्वात मोठा मसाले उत्पादक देश आहे आणि मसाल्यांचा सर्वात मोठा ग्राहक आणि निर्यातदार देखील आहे. २०२२ मध्ये भारताची देशांतर्गत बाजारपेठ १०.४४ अब्ज डॉलरची होती आणि २०२२-२३ मध्ये भारताने $४ अब्ज किमतीची उत्पादने निर्यात केल्याचे भारतीय मसाले मंडळाने म्हटले आहे.
 
या शहानिशा करण्याआधी एमडीएच कंपन्यांच्या विक्रीवर युएसमध्ये साल्मोनेला (Salmonella) बँकटेरियाचा कथित समावेश असल्याने बंदी घातली गेली होती. साल्मोनेला पदार्थाने गॅसट्रोइंटेनिशयल इलनेस होण्याचा धोका जाणवतो. युएस फूड व ड्रग्स अँडमिनिसट्रेशनने दिलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२३ मध्ये पर्यंत अमेरिकेत ६५ पैकी १३ कंपन्यांचे शिपमेंट रोखले गेले होते.
 
एफडीएने प्रत्येक शिपमेंटमध्ये किती प्रमाणात समाविष्ट केले होते हे सांगितले नाही परंतु १३ शिपमेंट नाकारण्यात आले होते त्यात मिश्रित मसाले आणि मसाले, तसेच मेथीचा समावेश आहे, डेटानुसार आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये, ११९ MDH शिपमेंटपैकी सुमारे १५ टक्के शिपमेंट्स मुख्यतः साल्मोनेला दूषित झाल्यामुळे नाकारण्यात आल्या होत्या, तर २०२१-२२ मध्ये नाकारण्याचे प्रमाण ८.१९ टक्के होते असे डेटा दर्शवितो.
 
एव्हरेस्टला युनायटेड स्टेट्समध्ये २०२३-२४ वर्षातील ४५० शिपमेंट्सपैकी फक्त एक शिपमेंट्स सॅल्मोनेलासाठी आतापर्यंत नाकारण्यात आले आहेत.
 
२०२२-२३ मध्ये सुमारे ३.७ टक्के एव्हरेस्टची यूएस शिपमेंट थांबवण्यात आली होती आणि त्याआधीच्या वर्षात यूएसमध्ये १८९ शिपमेंट्समध्ये कोणतेही नकार देण्यात आले नव्हते, असेदेखील डेटामध्ये स्पष्ट झाले आहे.