भारत जोडो यात्रेची बिलं काँग्रेसनं थकवली! कंटेनरचे पैसे मागत राहुल गांधींना सुनावले खडेबोल

    03-Apr-2024
Total Views |
bharat-jodo-nyay-yatra-vehicle-payment-not-made
 

नवी दिल्ली :       काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ट्रक कंटेनर पाठवणाऱ्या मालकांनी त्यांच्या वाहनांच्या भाड्याचे पैसे मिळाले नसल्याचा आरोप केला आहे. या ट्रकमालकांची वाहतूकदाराकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे, ती अद्याप भरलेली नाही. यासंदर्भात मालकांननी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ट्रक कंटेनर पाठवणाऱ्या मालकांनी त्यांच्या वाहनांच्या भाड्याचे पैसे मिळाले नसल्याचा आरोप केला आहे. या ट्रकमालकांची वाहतूकदाराकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे, ती अद्याप भरलेली नाही. यासंदर्भात मालकांनी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.




तर दुसरीकडे, वाहनधारक या प्रकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप वाहतूकदारांनी केला असून, त्यांचा माल अडविला आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, , काही ट्रक चालकांची वाहने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेसाठी गेली होती. ही वाहने दिल्लीतील अनिल कौशिक आणि मनोज सिंग या दोन वाहतूकदारांनी या ट्रकमालकांकडून घेतली होती. कौशिक हे बिहार बंगाल ट्रान्सपोर्टचे (दिल्ली) मालक आहेत तर मनोज सिंग दिल्ली हरिद्वार ट्रान्सपोर्टचे मालक आहेत.


हे वाचलंत का? - मंत्री आतिशी यांना 'ते' वक्तव्य भोवणार!, भाजपकडून कायदेशीर नोटीस


दरमयान, बिहार बंगाल ट्रान्सपोर्टचे मालक अनिल कौशिक यांनी ऑप इंडियाशी संवाद साधताना ते म्हणाले, हे वाहनचालक विनाकारण वाद निर्माण करत असल्याचे कौशिक यांनी सांगितले. ही वाहने दि. ०१ जानेवारी २०२४ रोजी मिळाल्याचे कौशिक यांनी सांगतानाच यानंतर २ महिने २२ दिवसांच्या प्रवासात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. वाहनांच्या पेमेंटबाबत कौशिक म्हणाले की, ते प्रत्येक वाहनासाठी दर १५ दिवसांनी पैसे देण्यात आले. या वाहनांचे २ महिन्यांचे पेमेंटही झाले असून २२दिवसांचे पेमेंट बाकी असून ते द्यायला तयार आहेत, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेसह पांढरे कंटेनर लावले होते. ही वाहने दि. २० डिसेंबर २०२३ रोजी काँग्रेसच्या यात्रेसाठी पाठवण्यात आली होती. या वाहतूकदारांकडे वाहने पाठविणाऱ्या मालकांचा आरोप आहे की, प्रवास संपल्यानंतरही त्यांच्याकडून वाहनांचे भाडे दिले जात नाही. पैसे मागितल्यावर त्यांच्याशी स्पष्ट बोलले जात नाही आणि जीवे मारण्याच्या धमक्याही मिळत असून मालकांचे कंटेनर अडविण्यात आले आहेत. पैसे मिळाल्यावर कंटेनर देऊ, असे मालकांचे म्हणणे आहे.