धमाकेदार फिचर्ससह मोटोरोला एज ५० प्रो आज लाँच होणार

हा फोन दुपारी १२ वाजत लाँच होऊन फ्लिपकार्टवर उपलब्ध!

    03-Apr-2024
Total Views |

Motorola edge 50 pro
 
मुंबई: आज मोटोरोला एज ५० प्रो भारतात आगमन करत आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोनची चर्चा तंत्रज्ञान वर्तृळात सुरु होती मिडहाय व मिड रेंज मधील इतर स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी मोटोरोला सज्ज झाली आहे. लेनोवोचा मालकीची मोटोरोला भारतात आगामी काळात नव्या स्मार्टफोनच्या रेंज आणणार असल्याची माहिती मिळत आहे.
 
आज दुपारी १२ वाजता हा फोन बाजारात लाँच करण्यात येणार आहे. हा फोन मोटोरोला एज ४० प्रो ची पुढील आवृत्ती असणार आहे. या फोनमध्ये अपग्रेड करत यावेळी नवीन डिझाईन आणण्यात येणार असून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा देखील या फोनमध्ये वापर करण्यात येणार आहे. कंपनीने युट्यूभ चॅनेलवर या संबंधी झलक दाखवली आहे.
 
 
 
मोटोरोला एज ५० प्रो ची वैशिष्ट्ये -
 
मोटोरोला एज ५० प्रो डिस्प्ले साईज - ६.७ इंच अमोल्डेड डिस्प्ले
 
 फोनचे रिझोल्युशन - १.५ के रिझोल्युशन
 
रिफ्रेश रेट - १४४ हर्टस
 
HDR 10 + सपोर्ट
 
इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर
 
इंटेलिजट कॅमेरा
 
प्रोसेसर - स्नॅपड्रॅगन ७ जनरेशन ३ प्रोसेसर
 
आयपी ६८ रेटिंग
 
१२५ वॉल्ट चार्जर व ५० वॉल्ट वायरलेस चार्जिंग
 
चिपसेट - Adreno 720 GPU
 
याशिवाय कंपनीकडून १४ अँड्रॉइड ओएसवर चालणार आहे. कंपनीकडून तीन वर्षांच्या ओएस अपग्रेड मिळण्याची शक्यता आहे. कदाचित हा फोन १२ जीबी रॅम व ५१२० जीबी स्टोरेजसह येऊ शकतो. हा फोन फ्लिपकार्टवर मिळणार आहे.