शेअर बाजार विश्लेषण: बाजारात चढता आलेख कायम ! सेन्सेक्स ४८६.५० अंशाने वाढत ७४३३९.४४ व निफ्टी १६७.९५ अंशाने वाढत २२५७०.३५ पातळीवर

मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये आजही वाढ कायम पीएसयु, ऑटो, मेटल समभाग तेजीत, तर रिअल्टी व कनज्यूमर ड्युरेबल्स समभागात घसरण

    25-Apr-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज वाढ झाली आहे. भारतातील पोषक वातावरण, कंपन्याचे समाधानकारक निकाल, मध्यपूर्वेतील थंडावलेला इराण इस्त्राईल संघर्ष यामुळे आज आशिया बाजार व विशेषतः भारतीय बाजारात चढे दर कायम राहिले आहेत. सेन्सेक्स ४८६.५० अंशाने वाढत ७४३३९.४४ पातळीवर स्थिरावला होता तर निफ्टी ५० हा १६७.९५ अंशाने वाढत २२५७०.३५ पातळीवर पोहोचला होता.आज बीएसई व एनएसईत आज अनुक्रमे ०.६६ व ०.७५ टक्क्याने वाढ झाली आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकातही अनुक्रमे ०.६६ व ०.६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
बीएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.७१ व ०.५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.४७ व ०.८४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनएसईत आज क्षेत्रीय निर्देशांकात रिअल्टी व कनज्यूमर ड्युरेबल्स समभागात घट झाली असून बाकी क्षेत्रीय समभाग 'हिरवे' कायम राहिले आहेत. सर्वाधिक वाढ पीएसयु बँक (३.७७ %).ऑटो (१.२७%) ,मेटल (१.११ %) , फार्मा (१.५७%) समभागात झाली आहे.
 
आज संध्याकाळी सोन्याच्या भावात आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढ झाल्याने भारतातील सोने महागले आहे. कालपासून दुपारपर्यंत सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम ३४० ते ३५० रूपयांनी घसरण झाली होती. मात्र युएस गोल्ड फ्युचरमध्ये वाढ झाल्याने एमसीएक्स सोन्याच्या निर्देशांकात ०.१९ टक्क्यांनी वाढ होत सोने ७११८७.०० पातळीवर पोहोचले आहे. भारतात संध्याकाळपर्यंत सोन्याचे १० ग्रॅम दर ३८० रुपयांनी घसरले होते.
 
आज मध्यपूर्वेतील शांतता प्रस्थापित झाल्याने कालपर्यंत स्थिरावलेले क्रूड तेल संध्याकाळपर्यंत पुन्हा महागले आहे.WTI Future क्रूड निर्देशांकात ०.१४ टक्क्याने व Brent क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.१५ टक्क्याने वाढले आहे. भारतातील एमसीएक्स क्रूड निर्देशांकात संध्याकाळी ०.३९ टक्क्यांनी वाढत क्रूडचे दर प्रति बॅरेल ६९१६ रुपयांवर पोहोचले आहे.
 
आज शेअर बाजारात सकारात्मकता कायम राहिली असली तरी जागतिक गुंतवणूकदारांनी गुंतवणूकीबाबत आखडता हात घेतला आहे.अमेरिकन बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात लांबल्याने अमेरिकन बाजारातील गुंतवणूकदारांना कंपन्यांच्या तिमाही निकालावर लक्ष केंद्रित केलं होते.काही दिवसात अमेरिकन बाजारात अमेरिकेचा जीडीपी आकडा येण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकीत सावध पवित्रा घेतला गेला आहे.लार्जकॅपमधील तुलनेने आज मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये वाढ कायम राहिली आहे. यामुळे बाजारात गुंतवणूकदारांनी नफा बूक केल्याची शक्यता असू शकते.
 
आज बीएसईत एकूण ३९३४ कंपन्यांच्या समभागांचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील २०७६ समभाग वधारले असून १७१७ समभागात आज घसरण झाली आहे.५२ आठवड्यातील सर्वाधिक मूल्यांकनात यामधील २४९ समभाग राहिले होते. ११ समभागांचे मूल्य ५२ आठवड्यातील सर्वाधिक कमी राहिले आहे.एकूण ७ समभागांचे मूल्य आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहे व ४ समभागाचे मूल्य लोअर सर्किटवर कायम राहिले आहे‌.
 
एनएसईत आज २७०७ कंपन्यांच्या समभागाचे ट्रेडिंग झाले असताना यातील १४४६ कंपन्यांच्या समभाग वधारले आहेत तर ११४९ समभागात घसरण झाली आहे. त्यामधील एकूण १३६ समभाग आज ५२ आठवड्यातील सर्वाधिक मूल्यांकनात राहिले असून ११ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे.एकूण १२७ समभाग अप्पर सर्किटवर व ४८ समभाग आज लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
बीएसईत एक्सिस बँक, एसबीआय, जेएसडब्लू स्टील,नेस्ले,सनफार्मा,आयटीसी, एनटीपीसी, एम अँड एम,एचसीएलटेक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, टाटा स्टील हे समभाग आज वधारले आहेत तर कोटक महिंद्रा, एचयुएल, टायटन कंपनी, बजाज फायनान्स, मारूती सुझुकी, एशियन पेंटस, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक या समभागात आज घसरण झाली आहे.
 
एनएसईत एक्सिस बँक,डॉ रेड्डी, नेस्ले, हिरो मोटोकॉर्प,अदानी एंटरप्राईज,जेएसडब्लू स्टील,एनटीपीसी,सनफार्मा,आयटीसी, एम अँड एम, इंडसइंड बँक,बीपीसीएल, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक,हिंदाल्को,अपोलो हॉस्पिटल या समभागात वाढ झाली आहे.कोटक बँक,हिंदुस्थान युनिलिव्हर, टायटन, बजाज फायनान्स, एशियन पेंटस, मारूती,एचडीएसी लाईफ या समभागात आज घसरण झाली आहे.
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव एनालिस्ट निरज शर्मा म्हणाले, 'बुल्सने F&O एक्स्पायरीच्या दिवशी दलाल स्ट्रीटवर आपली पकड कायम ठेवली, सलग पाचव्या सत्रात वाढ सुरू ठेवली. भारत VIX, ४.४२ % ने वाढून १०.७३ वर पोहोचला,अल्पावधीत अस्थिरतेची अपेक्षा.एप्रिल ते मे या मालिकेदरम्यान व्यापाऱ्यांनी एफ अँड ओ विभागातील होल्डिंग ओव्हर केल्याने अस्थिरता वाढली.शेवटी, निफ्टी २२५७० वर सकारात्मक नोटवर बंद झाला. तांत्रिकदृष्ट्या,निर्देशांकाने अंदाजे २२५०० पातळीचे मंदीचे अंतर ओलांडले आहे आणि त्याच्या वर कायम आहे.
 
अशाप्रकारे, निर्देशांक आपला वरचा कल चालू ठेवण्याची शक्यता आहे आणि २२७७६ चा सार्वकालिक उच्चांक तोडण्याचा प्रयत्न करू शकतो.निफ्टीचे अल्पकालीन समर्थन पातळी २२५०० आणि २२३०० आहेत, २२७८० आणि २३००० च्या आसपास प्रतिकार आहेत.निफ्टी स्मॉल कॅप निर्देशांकाने विक्रमी उच्चांक नोंदवला आहे,तर मिडकॅप निर्देशांक त्याच्या मागील उच्चांकापासून १% दूर आहे.
 
तांत्रिकदृष्ट्या, बँकनिफ्टीने ४८३०० चा टप्पा ओलांडला आहे आणि ४८५०० चा स्तर कायम ठेवण्याच्या मार्गावर आहे.जर बँक निफ्टी ४८५०० च्या वर बंद झाला तर रॅली ४९०००-४९५०० पर्यंत वाढू शकते.४९००० आणि ४९००० च्या प्रतिकारासह बँक निफ्टीसाठी अल्पकालीन समर्थन पातळी ४८००० आणि ४७००० आहेत.'
 
आजच्या बाजारावर प्रतिक्रिया देताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, 'आज निफ्टी ०.७५ % ने २२५७० वर सकारात्मक नोटवर बंद झाला तर सेन्सेक्स ०.६६% ने 74,339 वर बंद झाला.निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी फार्मा हे क्षेत्र होते ज्यांनी आज ३.७७ % ने मागे टाकले आणि चांगल्या परिणामांच्या अपेक्षेने १.५७ % ने PSU बँकांमध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित केले कारण त्यांच्याकडे खाजगी बँकांच्या तुलनेत ठेवीचे प्रमाण चांगले आहे जे आगाऊ वाढ आणि नफ्याला समर्थन देतील.
 
ॲक्सिस बँकेच्या चांगल्या परिणामांनी इंट्राडे ६ % पेक्षा जास्त चढाईला समर्थन दिले, जे आजच्या बँक निफ्टीच्या वाढीमध्ये अग्रगण्य योगदान देणारे होते. आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय हे इतर प्रमुख योगदानकर्ते होते. आरबीआयने कोटक महिंद्रा बँकेकडे मागणी केली आहे की "नवीन ग्राहकांना ऑनलाइन आणि मोबाईल बँकिंग चॅनेलद्वारे नवीन क्रेडिट कार्ड जारी करणे थांबवा आणि तात्काळ प्रभावाने थांबवा.बँकेला नवीन क्रेडिट कार्ड जारी करणे शक्य नाही. त्याचे डिजिटल चॅनेल आज कोटक महिंद्रा बँकेत विक्रीचे प्रमुख कारण होते.
 
निफ्टीमध्ये ॲक्सिस बँक, एसबीआय,डॉ. रेड्डीज लॅब्स,जेएसडब्ल्यू स्टील आणि नेस्ले इंडिया यांचा समावेश होता, तर नुकसान झालेल्यांमध्ये कोटक महिंद्रा बँक,एलटीआयमिंडट्री, एचयूएल, एसबीआय लाइफ इन्शुरन्स आणि टायटन कंपनी यांचा समावेश होता.'