'बॅकग्राऊंड नसणाऱ्यांनी बॉलीवूडमध्ये येऊ नये', प्रिती झिंटाचं मोठं विधान

    20-Apr-2024
Total Views |
प्रिती झिंटा हिने १९८८ साली हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि आजवर वविध भूमिकांतून तिने प्रेक्षकांना चकित केले आहे.
 

preeti  
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ९०चा काळ आपल्या सौंदर्याने गाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्रिती झिंटा (Preity Zinta). डिंपल गर्ल अशी ओळख असणाऱ्या प्रिती झिंटा (Preity Zinta) हिने एक महत्वाचे वक्तव्य केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टी म्हटलं की नेपोटीझम हा विषय फार चर्चेत असतो. याव्यतिरिक्त इंडस्ट्रीशी कोणताही संबंध नसलेले कलाकार जेव्हा अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावू पाहतात त्याबद्दल प्रितीने मोठं विधान करत बॉलिवूड मुलींसाठी सुरक्षित नसल्याचं देखील तिने म्हटले आहे.
 
प्रीती झिंटाने एका मुलाखतीत म्हटले की, “कोणतीही बॅकग्राऊंड नसलेल्या मुला किंवा मुलींसाठी बॉलीवूड सुरक्षित नाही. फक्त फिल्मीच नाही, तर कोणतंही बॅकग्राऊंड नसलेल्या लोकांनी बॉलीवूडमध्ये येऊ नये. इथे अशी अनेक लोकं आहेत, जे काम मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होतात. अशात जर मी रस्त्याच्या मधोमध उभी राहून म्हणाले की आ बैल मुझे मार तर काय होईल? सध्या प्रीतीच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
 
प्रिती झिंटाने केलेल्या या वक्तव्यानंतर आता त्याचे पडसाद काय उमटणार हे पाहणे फार महत्वाचे आहे. कारण. हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांचा कुणीही गॉडफादर नसला तरी त्यांनी आपल्या केवळ अभिनयाची जोरावर यशस्वी कारकिर्द घडवली आहे.