शेअर बाजार विश्लेषण: बाजार गंडले ! तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर खाली सेन्सेक्स ७३९०३ व निफ्टी २२४५३ वर

आज सगळ्यात जास्त वाढ कनज्यूमर ड्युरेबल्स व मिडिया समभागावर

    02-Apr-2024
Total Views |

Stock Market
 
मोहित सोमण: तीन दिवसांच्या रॅलीनंतर आज बाजारात किंचितशी पडझड आली आहे. अखेरच्या सत्रात सेन्सेक्स १०४.६२ अंशाने घसरून ५३७९२.४१ पातळीवर थांबला. निफ्टी ५० निर्देशांक ८.७० अंशाने कमी होत २२४५३.३० अंशावर थांबला आहे.बीएससीवर (BSE) वरील सेन्सेक्स बरोबर बँक निर्देशांकात आज १०४.६२ अंकाने घसरण झाली आहे तर बँक निफ्टीत ३२.८० अंशाने घसरण झाली आहे.
 
काल सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात मोठी वाढ झाली होती. कालच्या ३८१.८४ सेन्सेक्स बँक निर्देशांक व ४५३.६५ बँक निर्देशांकातील तुलनेत आज बँक निफ्टीत मोठी घसरण झाली आहे. आज सकाळच्या सत्रात सुरूवातीला सेन्सेक्स निफ्टीने संथ सुरूवात केली होती. बाजार उघडल्यानंतर आज ०.०७ अंशाने बाजार खालीच राहिला असल्याने आज बाजारातील चढउतार कमीच राहिली आहे.
 
बीएससी मिडकॅपमध्ये १.१४ टक्क्याने तर स्मॉलकॅपमध्ये १.२८ टक्क्याने वाढ झाली आहे. तर एनएनसीत स्मॉलकॅपमध्ये १.४५ टक्क्याने व मिडकॅपमध्ये १.०१ टक्क्याने वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात आज सगळ्यात जास्त वाढ कनज्यूमर ड्युरेबल्स (१.८६%) , व मिडिया (१.८५ %) या निर्देशांकात वाढ झाली आहे तर सर्वाधिक नुकसान आयटी व फार्मा समभागावर झाला आहे.
 
बीएससीत गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा एम अँड एम, नेसले, टाटा स्टील, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, एनटीपीसी, एशियन पेटंस या समभागात झाले आहे. नुकसान कोटक महिंद्रा बँक, एचसीएलटेक, सन फार्मा, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस, एक्सिस बँक, बजाज फायनान्स, टीसीएस या समभागात झाले आहे.
 
एनएससीमध्ये गुंतवणूकदारांना फायदा बीपीसीएल, अदानी पोर्टस, टाटा मोटर्स, डिवीज , टाटा स्टील, एनटीपीसी ,अदानी एंटरप्राईज, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह या समभागात झाले आहे. तर हिरो मोटोकॉर्प, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, भारती एअरटेल, आयशर मोटर्स, टेक महिंद्रा,अपोलो हॉस्पिटल या समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.
 
बाजारातील घसरण होऊन देखील अदानी पॉवरचा समभाग ५ टक्क्याने अप्पर सर्किटवर राहिला आहे. कंपनीच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याने आयआरईडीए (IREDA) समभागात ५ टक्क्याने अप्पर सर्किटवर वाढ झाली आहे.
 
युएस शेअर बाजारात NASADAQ वगळता DoW व S& P 500 मध्ये घसरण झाली आहे.आशियाई बाजारात SHANGHAI वगळता HANG SENG, NIKKEI या शेअर बाजारात तेजी दिसली आहे.आज वैश्विक पातळीवरील मिश्र संकेत मिळाले असताना आज भारतीय बाजारात मात्र पडझडीचे संकेत मिळाले आहेत. एमसीएक्सवर सोन्याच्या निर्देशांकात ०.८२ टक्क्याने वाढ झाली असताना क्रूड तेलाच्या निर्देशांकात आज १.६१ टक्क्याने भाववाढ झाली आहे. परिणामी क्रूड तेलाच्या भावात वाढ झाल्याने प्रति बॅरेल किंमत ७११० रूपये पोहोचली आहे. 
 
आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड तेलाच्या मागणीत वाढ झाल्याने तेलाच्या किंमती WTI Future व Brent निर्देशांकातही वाढ झाली आहे.भारतीय रूपया प्रति डॉलर घसरत ८३.४२ रुपयांवर बंद झाला आहे.
 
मिड कॅप व स्मॉलकॅपमधील वाढ झाली तरी बँक निफ्टीत घट झाल्याने आज बाजारात मंदी कायम राहिली आहे.आता लवकरच बँका व कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे क्रमांक आल्याने सेन्सेक्स व निफ्टीत मोठ्या प्रमाणात हालचाल होऊ शकते. अखेरच्या सत्रात निफ्टीची पातळी २२४५३.३० वर थांबली असली तरी दिवसभरात सर्वाधिक निफ्टी पातळी २२४९७.६० पर्यंत पोहोचली होती.
 
सेन्सेक्स ८३.४७५ ला बंद झाला असला तरी सेन्सेक्सची सर्वाधिक पातळी ८३.४९५ पातळीवर पोहोचला होता. याचा अर्थ आज सेन्सेक्स व निफ्टी तुलनात्मकदृष्ट्या घसरला असला तरी पुन्हा एकदा शेअर बाजारात गुंतवणूक वाढू शकते असा विश्वास तज्ञांना वाटत आहे.
 
 
शेअर बाजार का पडले ?
 
संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आज ५२२ कोटींहून अधिक समभाग विकले आहेत.
 
मध्यपूर्वेतील देशांमध्ये तेलांच्या किंमतीत दबाव निर्माण झाल्याने क्रूड तेल महागले
 
रुपयांची झालेली घसरण
 
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी प्रतिक्रिया -
 
आजच्या बाजारातील निफ्टीतील हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट रुपक डे म्हणाले, "निफ्टीने एका सपाट सुरुवातीनंतर एका मर्यादेत व्यवहार केले. निर्देशांकाने दैनिक चार्टवर बॅक-टू-बॅक डोजी पॅटर्न तयार केले, जे विशेषत: पुढील हालचालीपूर्वी विराम दर्शविते. तथापि, भावना सकारात्मक राहते, निफ्टी महत्त्वपूर्ण हालचालीच्या वर बंद झाला. सरासरी. तेजी क्रॉसओव्हरमध्ये RSI द्वारे दर्शविल्याप्रमाणे, गती देखील सकारात्मक राहते. अल्पावधीत, कल सकारात्मक आहे, २२६५०-२२७५० पर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे. खालच्या टोकाला समर्थन २२३५० -२२३०० वर स्थित आहे."
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना बोनझा पोर्टफोलिओ लिमिटेडचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, ' आज निफ्टी २२४५३ वर बंद झाला, तर सेन्सेक्स ७३९०३ वर बंद झाला. निफ्टी मीडिया आणि निफ्टी मेटल हे क्षेत्र होते ज्यांनी आज अनुक्रमे १.८५ % आणि १.५० % ने वाढ केली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय समर्थित निफ्टी मेटल येथे उत्पादन क्रियाकलापांमध्ये सुधारणा झाली आहे. भारताचा मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय फेब्रुवारी २०२४ मध्ये ५६.९ वरून मार्च २०२४ मध्ये ५९.१ पर्यंत वाढला, ५९.३ च्या अपेक्षेपेक्षा कमी वाढला आहे .तर फेब्रुवारी २२०४ मध्ये ४८.८ वरून मार्च 2024 मध्ये ५०.३ पर्यंत, US ISM उत्पादन PMI वाढले. हे सप्टेंबर २०२२ नंतरच्या पहिल्या विस्ताराचे संकेत देते.
 
निफ्टीमध्ये टाटा कंझ्युमर्स प्रोडक्ट्स, एम अँड एम, बीपीसीएल, बजाज ऑटो आणि अदानी पोर्ट्सचा सर्वाधिक फायदा झाला तर सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये हीरो मोटोकॉर्प, एचसीएल टेक्नॉलॉजीज, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्स यांचा समावेश आहे.'
 
आजच्या बाजारातील निफ्टीविषयी प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट कुणाल शहा म्हणाले, "बँक निफ्टी निर्देशांकाने आरबीआयच्या धोरणाच्या अपेक्षेने एक संकुचित एकत्रीकरण पॅटर्न राखला. ४७०० वर डाउनसाइड सपोर्ट आणि ४८००० वर अपसाइड रेझिस्टन्ससह, दोन्ही दिशेने ब्रेकआउटमुळे बाजारातील महत्त्वपूर्ण हालचाली सुरू होऊ शकतात. एकत्रीकरण असूनही, एकूण भावना तेजीत राहिली, असे सूचित करते. पाहिजे, विशेषत: ४७४०० -४७३५० झोनच्या आसपास त्वरित समर्थनासह त्या घटांना खरेदीच्या संधी म्हणून पाहिले.'