शेअर बाजार विश्लेषण: नाट्यमयरित्या बाजार उसळले ! चार दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स ५३९.३४ व निफ्टीत १५१.१५ अंशाने वाढ

फायनाशियल सर्विसेस, एफएमसीजी ,मेटल समभागात वाढ तर मिडिया, फार्मा, पीएसयु बँक समभागात नुकसान

    19-Apr-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण: शेअर बाजारात पुन्हा नाट्यमयरित्या आज अखेर वाढ झाली आहे. सकाळी गिफ्ट निफ्टीनंतर प्री मार्केट ट्रेडिंगमध्ये बाजारातील घसरणीकडे कल दिसत असताना सकाळी बाजारात सेन्सेक्स निफ्टी घसरला असताना बाजाराच्या अखेरच्या सत्रात मात्र वाढ झाली आहे.सेन्सेक्स व निफ्टीत वाढ झाल्याने पुन्हा बाजारात सकारात्मकता झळकताना दिसत आहे.
 
आज सेन्सेक्स ५३९.३४ अंशाने वाढत ७३०८८.३३ पातळीवर वाढ झाली आहे.निफ्टी ५० मध्ये १५१.१५ अंशाने वाढत २२१४७.०० पातळीवर वाढ झाली आहे. आज सेन्सेक्स व निफ्टीत ०.८३ व ०.६९ टक्क्यांने अनुक्रमे वाढ झाली आहे.सेन्सेक्स मिडकॅपमध्ये मात्र ०.०४ व स्मॉलकॅपमध्ये ०.१ टक्क्याने घसरण झाली आहे. एनएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.५६ व ०.१३ टक्क्यांनी घट झाली आहे.
 
प्रामुख्याने आज बीएसई (BSE) बँक निर्देशांकात ५४२.४२ अंशाने वाढ होत बँक निर्देशांक ५३७२०.७६ वर पोहोचले आहे तर  एनएसईत (NSE) बँक निफ्टीत ५०४.७० अंशाने वाढत ४७५७४.१५ पातळीवर वाढ झाली आहे.इस्त्राईल इराणमधील संघर्ष युद्ध व युएस बाजारातील मंदीचे सावट, फेडरल रिझर्व्ह व्याजदर बँकेचे कपात होण्याची शक्यता पुढे ढकलली गेल्याने देखील बँक निर्देशांकांमुळे आज भारतीय बाजारात मुख्य वाढ झाली आहे.
 
एनएसईमधील क्षेत्रीय निर्देशांकात फायनाशियल सर्विसेस, एफएमसीजी ,मेटल, प्रायव्हेट बँक या समभागात आज प्रामुख्याने वाढ झाली असून सर्वाधिक नुकसान मिडिया,फार्मा,पीएसयु बँक,हेल्थकेअर समभागात झाले आहे.आज बीएसईत एकूण बाजारी भांडवल (Market Capitalisation) ३९३.४५ लाख कोटी व एनएसईत एकूण बाजारी भांडवल ३९०.१३ लाख कोटी राहिले आहे.
 
बीएसईत आज एकूण ३९०३ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १७१७ समभागांचे मूल्य वधारले असून २०७३ समभागांचे मूल्यांकन आज घसरले आहे. त्यातील एकूण १७४ समभागांचे मूल्य ५२ आठवड्यातील सर्वाधिक राहिले असून १९ समभागांचे मूल्य ५२ आठवड्यातील सर्वाधिक कमी राहिले. एकूण समभागापैकी ९ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले असून ३ समभाग आज लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
एनएसईत आज एकूण २७१६ समभागांचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १२२६ समभागांच्या मूल्यांकनात वाढ झाली. १३६४ समभाग मात्र आज गुंतवणूकादारांनी नाकारले आहेत.५२ आठवड्यातील ८६ समभागाचे मूल्य आज सर्वाधिक राहिले असून १६ समभागाचे मूल्यांकन आज घसरले आहे. एकूण समभागापैकी ९८ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले असून ८३ समभाग आज लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
सकाळी इस्त्राईलने इराणवर हल्ला केल्याच्या बातमीने बाजारात दबावाची स्थिती निर्माण झाली असताना इराणने हानी झाल्याचे दावे फेटाळले असल्याने बाजारात आज नव्याने पुन्हा उभारी मिळाली आहे. परदेशी व देशांतर्गत गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काही प्रमाणात राखली.
 
अखेरीस बाजारात चार दिवसांच्या घसरणीनंतर गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. सकाळपूर्वी ९० डॉलर्स प्रति बॅरेल पोहोचलेले क्रूड तेलाचे भाव घसरल्याने आज आशियाई बाजारात त्याचा सकारात्मक परिणाम दिसला. याशिवाय काल डॉलरचा तुलनेत घसरलेला रूपया पुन्हा ६ पैशाने वधारल्याने काही प्रमाणात शेअर बाजारातील मूल्यांकनात त्याची भर पडली आहे. आरबीआयच्या देखरेखीखाली आज विदेशी बँकानी डॉलर्सची विक्री केल्याने आज रुपयांच्या मूल्यांकनात नियंत्रण राखणे सेंट्रल बँकेला शक्य झाले आहे.
 
कालपर्यंत स्वस्त झालेल्या सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे.२४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ५४० रुपयांने वाढ झाली आहे. क्रूड तेलाच्या निर्देशांकात आज मागणी घटल्याने घसरण झाली.WTI Future क्रूड तेल निर्देशांकात आज ०.९८ टक्क्यांनी व Brent निर्देशांकात ०.९८ टक्क्यांनी घट झाली आहे. भारतातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange) मध्ये क्रूड तेलाच्या १.४९ टक्क्यांनी घसरण होत तेलाचे भाव ६७९३.०० रुपये प्रति बॅरेलवर पोहोचले आहेत.
 
आज बीएसईत बजाज फायनान्स, एम अँड एम, एचडीएफसी बँक, जेएसडब्लू, मारूती सुझुकी, विप्रो, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, टाटा स्टील,टेक महिंद्रा, टायटन,आयसीआयसीआय बँक, एसबीआय समभागात आज वाढ झाली आहे. एचसीएलटेक,नेस्ले,लार्सन,टाटा मोटर्स, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंटस, एनटीपीसी या समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.
 
एनएसईत आज बजाज फायनान्स, एम अँड एम, एचडीएफसी बँक,मारुती सुझुकी, जेएसडब्लू स्टील,विप्रो,अपोलो हॉस्पिटल, आयटीसी,आयसीआयसीआय बँक,टाटा स्टील,टायटन,एक्सिस बँक,इंडसइंड बँक,हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपन्यांच्या समभागात गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे.बजाज ऑटो,नेस्ले इंडिया,डिवीज,टीसीएस,हिरो मोटोकॉर्प,टीसीएस,टाटा मोटर्स,ब्रिटानिया,इन्फी,एनटीपीसी,डॉ रेड्डी,आयशर मोटर्स,श्रीराम फायनान्स,सिप्ला या समभागात गुंतवणूक नुकसान झाले आहे.
 
आजच्या बाजारावर प्रतिक्रिया देताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजने, "व्यापाराच्या प्रारंभी मोठ्या घसरणीनंतर, इस्रायल आणि इराणमधील भू-राजकीय तणाव कमी झाल्यामुळे, भारतीय स्टॉक निर्देशांकांनी शुक्रवारी लक्षणीय पुनरागमन केले. निफ्टी निर्देशांकाने २२००० चा टप्पा ओलांडला, २१७७८ च्या इंट्राडे नीचांकी वरून ३५० हून अधिक अंकांनी वाढ झाली. तांत्रिक दृष्टिकोनातून २२१४७ वर बंद होताना इंडेक्सने २२००० च्या ट्रेंड लाइन सपोर्टवर पुन्हा दावा केला आहे,जोपर्यंत निर्देशांक २२३००-२२५०० च्यावर टिकून राहणे शक्य आहे.
 
शुक्रवारी सुरुवातीच्या सत्रात निफ्टी बँक इंडेक्स झपाट्याने घसरला, परंतु दिवसभरातील उच्च नोट बंद करण्यासाठी ४७५७४ वर त्याने स्मार्ट रिकव्हरी केली, तांत्रिकदृष्ट्या, बँकनिफ्टीसाठी ट्रेंड लाइन सपोर्ट ४६६०० च्या जवळ आहे. जर निर्देशांकाला ४६६०० पातळीचा पाठिंबा असेल, तर ४८८०० च्या दिशेने पुलबॅक रॅली नाकारता येत नाही. बँक निफ्टीसाठी अल्पकालीन समर्थन पातळी ४७००० आणि ४६००० वर ओळखल्या जातात, तर प्रतिकार पातळी ४८०००आणि ४९०६० वर आहेत. "
 
बाजारातील परिस्थितीविषयी बोलताना आज बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, "आज निफ्टी ०.६९ % ने २१९९५ वर सकारात्मक नोटवर बंद झाला,तर सेन्सेक्स ०.८३% घसरत ७३०८८ वर बंद झाला. तर निफ्टी बँक हे क्षेत्र होते ज्याने आज अनुक्रमे १.०७ % वर कामगिरी केली. निफ्टी बँकेची कामगिरी मुख्यतः एचडीएफसी बँकेमुळे होती. मजबूत ठेव वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार HDFC बँकेकडे आकर्षित झाले आणि परिणामी बँक २.४५% वर हिरव्या रंगात बंद झाली.
 
इराणच्या भूभागावर इस्रायली हल्ल्यांच्या अफवांमुळे जागतिक बाजारपेठेतील जोखीम टाळल्यामुळे भारतीय बाजारातील सुरुवातीचे व्यवहार नकारात्मक होते. पण बाजाराने पुन्हा उसळी घेतली.वृत्तानुसार, इराणने सांगितले की, कोणताही थेट हल्ला झाला नाही आणि हा स्फोट इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेमुळे झाला आहे."
 
बजाज फायनान्स, एम अँड एम,एचडीएफसी बँक,मारुती सुझुकी आणि जेएसडब्ल्यू स्टील हे निफ्टीमध्ये सर्वाधिक लाभधारक होते, तर बजाज ऑटो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, डिव्हिस लॅब्स, टीसीएस आणि नेस्ले इंडिया यांचा समावेश आहे.
 
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, 'सकाळीच अमेरिकन न्युज मिडियातुन बातमी आली की इस्त्राईलने इराणवर मिसाईलने हल्ला केला त्यामुळे बाजार नकारात्मक होता. दुपारपर्यंत इराणने फार काही विशेष घडले नसल्याबद्दलची बातमी दिली. बाजार त्यानंतर स्थिर झाला.कच्चे तेल ही खाली येत असल्याबद्दल खात्री करत बाजार वर गेले आहे.आता बाजार फेडच्या दर कपातीकडे नजर ठेऊन महागाई आटोक्यात येण्याकडे डोळे लाऊन बसला आहे. महिना अखेरीस फेड मिटींगची वाट पहात आहे. वर्ष अखेरीस अमेरीकितही निवडणुकीसाठी व्याजदर कपात, महागाईवर नियंत्रण, आर्थिक मंदीमधुन बाहेर पडलो आहोत,वगैरे दर्शविणे व त्यामुळे निवडणुकीत आकर्षण आणता येईल असे चित्र आहे.
 
आजी माजी अध्यक्ष दोघेही प्रतिस्पर्धी आहेत. युद्ध हळुहळु मिडियातुनही संपण्यास सुरवात झाली तर बाजार नक्कीच सुधारेल. वर्षभरातील तीन वेळा अमेरिकेत व्याज दर कपात अपेक्षित आहे. त्यामुळेच पुढील आठवड्यात बाजार स्थिरता येईल अशी आशा करूया."
 
आज बाजारातील सोन्याच्या किमतीतील हालचालीबाबत प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले,"सोन्याच्या किमती ७२५००-७२८०० च्या मर्यादेत व्यवहार झाल्या, इराण आणि इस्रायलमधील भू-राजकीय तणावामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. दोन्ही राष्ट्रांमधील परस्पर समंजसपणाची कोणतीही चिन्हे सोन्यामध्ये नफा बुकींगला प्रवृत्त करण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यातील मौल्यवान धातू भौगोलिक-राजकीय तणाव आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांवरील अद्यतनांशी संबंधित बातम्यांवर प्रतिक्रिया देतील.
 
तथापि रुपयांच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी यांनी सांगितले की,"इराणवर इस्त्रायली ड्रोन हल्ल्यानंतर भू-राजकीय तणावाच्या सुरुवातीच्या चिंतेनंतरही रुपयाने ताकद दाखवली.०.०५ पैशाने वाढून ८३.४८ पर्यंत पोहोचला. तथापि, जागतिक नेत्यांनी संयम राखण्याच्या आवाहनामुळे बाजारातील भीती कमी झाली,ज्यामुळे सुरुवातीला कमकुवत झाल्यानंतर रुपयामध्ये सुधारणा झाली. भारतीय निवडणुका सुरू असताना, रुपयाची श्रेणी ८३.२०- ८३.७० च्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे.'
 
निफ्टीवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट रुपक डे म्हणाले, "दैनंदिन चार्टवर, एक पॅटर्न तयार झाला आहे, जो अनेकदा सुधारणेनंतर तेजीचा उलट दर्शवतो. याव्यतिरिक्त, निर्देशकाने 55EMA, एक अल्प-मुदतीची मूव्हिंग सरासरी ओलांडली आहे. या मूव्हिंग सरासरीच्या वर बंद होणे सकारात्मक अल्प-मुदतीचे सूचित करते.पुढचा कल पाहता, २२३०० च्या वरची निर्णायक प्रगती २२००० च्या डाउनसाइडवर टिकून राहते.
 
आज बँक निफ्टीत मोठी वाढ झाली असताना निफ्टीवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट कुणाल शहा म्हणाले,"बँक निफ्टी निर्देशांकात ४६५०० च्या सपोर्ट लेव्हलवरून तेजीचे छेदन करणारा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाल्यामुळे मजबूत तेजीची गती दिसून आली. निर्देशांकाचा तात्काळ प्रतिकार ४८००० वर स्थित आहे,जेथे कॉल साइडवर ओपन इंटरेस्टची लक्षणीय वाढ आहे, हे सूचित करते. एक संभाव्य अडथळा निर्देशांकाने ४७२००आणि ४७००० च्या दरम्यान त्वरित समर्थन स्थापित केले आहे.