मनोज जरांगेंची मोठी घोषणा! "लोकसभेत अपक्ष उमेदवार..."

    30-Mar-2024
Total Views |
Manoj Jarange Maharashtra


मुंबई : 
  आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली असून लोकसभेत अपक्ष उमेदवार न देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, सगे-सोयरे याला विरोध करणाऱ्यांना पाडा, असे आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केले आहे. तसेच, मी माझी जात राजकारणाच्यासमोर आणू शकत नाही, त्यामुळे लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जरांगेंनी स्पष्ट केले आहे.

 
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार देणार नसून मराठा समाजाला ज्याला मतं द्यायचं आहे त्यांना द्या, असेही जरांगेंनी म्हटले आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीत कुणालाही पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या राजकारणाच्या नावावर मी माझी जात मातीत मिळू देणार नाही. ज्यांना पाडायचं आहे त्यांना निवडणुकीत पाडा, असेही ते यावेळी म्हणाले.


हे वाचलंत का? - केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे पक्षाच्या जाहीरनाम्याची सूत्रे!


लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाला पडायचं नाही, तसेच आपण अपक्ष उमेदवार देणार नसल्याचे मनोज जरांगेंनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जरांगे लोकसभा निवडणूक लढविणार का, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. त्यांच्या निवडणूक लढविण्याच्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात नवीन समीकरण पाहायला मिळाले असते अशा चर्चांना उधाण आले होते.

मनोज जरांगेंनी निवडणूक लढावी अशी मागणी राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी केली होती. तसेच, भेटीगाठी देखील घेण्यात आल्या होत्या. खुद्द प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंना निवडणूक लढविण्यासाठी भेट घेतली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानंतर राज्यात चर्चेचा विषय ठरलेले जरांगे यांनी निवडणूक लढवावी त्याला वंचितकडून पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे आता जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट करत निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे.