भविष्यात महागाईतील परिस्थिती पाहून फेड दरकपातीचा निर्णय घेईल - जेरोम पॉवेल

महागाई दर गेले २ वर्षांपासून २ टक्के मर्यादेच्या आतमध्येच

    30-Mar-2024
Total Views |

Jerome Powell
 
मुंबई: फेडरल रिझर्व्ह चेअरमन जेरोम पॉवेल यांनी शनिवारी फेडरल रिझर्व्ह व्याज दरात कपात करण्याचे ठरवले असले तरी आता ते शक्य होणार नाही असे प्रतिपादन जेरोम पॉवेल यांनी अमेरिकेतील प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे. 'जोपर्यंत तसे संकेत मिळत नाहीत तो पर्यंत दर कपात होणार नाही. 'अजून महागाईत वाढ झाल्याचे स्पष्ट दिसून आले नसल्याने जैसे थे परिस्थिती आहे. ' असे कार्यक्रमात बोलताना निक्षून सांगितले.
 
सॅन फ्रान्सिस्को येथील परिषदेत बोलताना त्यांनी, 'महागाई दर कमी होण्याची चिन्हे दिसून २ टाक्यांच्या मर्यादेत राहताना दिसत आहे.तरीही आगामी काळात परिस्थितीचा अंदाज घेताना दर कपातीचा निर्णय घेताना या महागाईची पडताळणी करावी लागेल. सर्वाधिक महागाई दर २ वर्षांपूर्वी आढळून आला होता.' असे दर कपातीविषयी बोलताना पॉवेल यांनी सांगितले आहे.
 
मार्च २०२२ मधील महागाई दरात मोठी वाढ झाल्याने आक्रमकपणे फेडने महागाईला आक्रमक प्रतिसाद दिला होता.अर्थव्यवस्था वाढताना गेली २ वर्ष महागाई दर २ टक्के मर्यादा टप्प्यात आहे. सहा तिमाहीत महागाई दरात कुठलाही बदल झाला नसल्याने महागाई दर स्थिर राहिले होते. मागील २ वर्षात बेरोजगारी दरात घट होऊन ४ टक्क्यांहून बेरोजगारी दर कमी झाल्याचे पॉवेल यांनी सांगितले आहे.