विजय शिवतारे यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा; पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार

    28-Mar-2024
Total Views |
 shivtare-pawar-fadanvis-shide 
 
मुंबई :- शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे Vijay shivtare Baramati यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत विशेष बैठक पार पडली. या बैठकीत शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली सांगून त्याद्वारे विजय शिवतारे यांच्या मनातील सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आले. त्यामुळे उद्या आपण या बैठकीतील चर्चेबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर विस्तृतपणे मांडणार असल्याचे शिवतारे यांनी ठरवले आहे. या बैठकीवेळी शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले हेदेखील उपस्थित होते.
 
विजय शिवतारे यांनी सुरुवातीला बारामती मतदारसंघातुन निवडणुक लढवणार असल्याची भुमिका घेतली होती. बारामतीची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी ते प्रयत्नशिल होते. त्याबाबत शंभुराजे देसाई आणि इतर नेत्यांशी त्यांनी चर्चाही केली होती. त्यानंतर आपण अपक्ष निवडणुक लढवणार आणि काहीही झाले तरी माघार घेणार नाही असा पवित्राही त्यांनी घेतला होता.
 
 
बारामती मध्ये महाविकास आघाडीकडुन सुप्रिया सुळे आणि महायुतीकडुन सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. या पवार विरुद्ध पवार लढाईमध्ये जनतेला तीसरा पर्याय देण्यासाठी मी निवडणुक लढवणार असल्याचं विजय शिवतारे यांनी म्हटले होते. त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्नही केला गेला होता.
 
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवतारेंच्या प्रश्नांवर चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगण्यात आले आहे. लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका स्पष्ट करणार असल्याचे विजय शिवतारे यांनी सांगितले आहे.