मालमत्ता कर बड्या थकबाकीधारकांना पालिकेच्या नोटीसा!

...तर नियमानुसार कायदेशीर कारवाई होणार

    22-Mar-2024
Total Views | 27
Property tax bmc
 

मुंबई :     निर्धारित कालावधीमध्ये करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीधारकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आता नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच दिलेल्या मुदतीत त्यांनी करभरणा न केल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार त्यांच्या मालमत्तेवर अटकावणी व जप्तीची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन खात्याच्यावतीने मुंबई शहर आणि उपनगरांमधील मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती तसेच आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांची ऐनवेळची गैरसोय टाळण्यासाठी साप्ताहिक सुटी तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सर्व विभागांमध्ये कर भरणा करण्याची सोय करण्यात आली आहे.
तथापि, काही मोठ्या थकबाकीधारकांकडून अद्याप करभरणा करण्यात येत नसल्याने आणि त्यांना वेळोवेळी सूचना देऊनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे खात्याच्यावतीने नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या मालमत्ताधारकांनी विहित कालावधीमध्ये करभरणा न केल्यास त्यांच्या मालमत्तेला अटकावणी किंवा जप्तीची कारवाई करण्यात येईल, अशी सूचना नोटिसीत देण्यात आली आहे. त्यामुळे नोटीसप्राप्त मालमत्ता धारकांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी लागलीच करभरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


 
दि. ३१ मार्चपर्यंतच्या ‘टॉप टेन’ थकबाकीदारांची यादी-


१. एल अँड टी स्कॉमी इंजिनिअरिंग (एफ उत्तर विभाग)- ८८ कोटी ६३ लाख ७८ हजार ६७९ रुपये

२. रघूवंशी मिल्स (जी दक्षिण विभाग)- ७१ कोटी २३ लाख ६५ हजार ८५२ रुपये

३. एचडीआयएल (एच पूर्व)- ५३ कोटी १२ लाख ३९ हजार ९५३ रुपये

४. पोपटलाल जमनालाल, सी ब्रिझ बिल्डिंग ६ ते १५ मजले (जी दक्षिण)- ४७ कोटी ९९ लाख ८४ हजार ७६६ रुपये

५. एचडीआयएल (के पूर्व)- ४४ कोटी ५ लाख ५४ हजार ३५ रुपये

६. रघूवंशी मिल्स (जी दक्षिण विभाग)- १७ कोटी ८७ लाख ६१ हजार ५६५ रुपये
 
७. सुभदा गृहनिर्माण संस्था (जी दक्षिण)- १६ कोटी ८४ लाख ७५ हजार ७०० रुपये

८. नॉव्हेल्टी सिनेमा (डी विभाग)- १६ कोटी १ लाख ८० हजार ६३ रुपये

९. ओमकार डेव्हलपर्स प्रा. लि. (जी दक्षिण विभाग)- १२ कोटी २१ लाख ३२ हजार १७३ रुपये
 
१०. गोल्डन टोबॅको कंपनी प्रा. लि (के दक्षिण विभाग)- ८ कोटी ६७ लाख ८१ हजार ४८८ रुपये




 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121