काँग्रेसच्या राज्य सचिवावर बलात्काराचे आरोप!

    06-Feb-2024
Total Views | 39
 nsui leader
 
रायपूर : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एका मुलीने काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयचा राज्य सचिव निखिल बघेल याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. मुलीचे म्हणणे आहे की, आरोपीने तिला कॅफेमध्ये नेण्याच्या बहाण्याने आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. वृत्तानुसार, आरोपी स्वतःला राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा पुतण्या असल्याचे सांगतो. या दोघांचे अनेक फोटोही समोर आले आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, रायपूरमधील डीडी नगर पोलीस ठाण्यात एनएसयूआय राज्य सचिव निखिल बघेल यांच्याविरोधात २० वर्षीय तरुणीने गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी बीबीएचे शिक्षण घेते आणि एनईईटीच्या तयारीत व्यस्त आहे. आरोपी निखिल बघेलशी तिची एक महिन्यापूर्वी इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाल्याचे तिने सांगितले आहे.
 
मुलीच्या म्हणण्यानुसार, ओळख झाल्यानंतर निखिल रायपूरच्या त्याच जिममध्ये येऊ लागला जिथे मुलगी देखील जायची. कथितरित्या, १ फेब्रुवारी २०२४ रोजी निखिल बघेलने त्याला व्हॉट्सॲपवर मेसेज करून जिमच्या बाहेर बोलावले आणि कॅफेमध्ये नेण्याचा आग्रह धरला. आरोपीचे रायपूरच्या सुंदरनगरमध्ये स्वतःचा कॅफे आहे.
 
पिडितेने लावलेल्या आरोपानुसार, जेव्हा मुलगी कॅफेमध्ये जाण्यास तयार झाली तेव्हा निखिलने तिला त्याच्या घरी नेले. आईही घरी असल्याचे त्याने मुलीला सांगितले. मात्र मुलगी घरी पोहोचली तेव्हा तेथे कोणीच नव्हते. यानंतर आरोपी निखिल बघेलने तिला आपल्या बेडरूममध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. निखिल बघेलनेही नंतर मुलीशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. मात्र, तरुणीने ३ फेब्रुवारीला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 
निखिल बघेल यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मुलगी ब्लॅकमेल करत असल्याचं त्याचं म्हणणं आहे. मुलीने त्याला तिच्याशी लग्न करण्यास सांगितले आणि त्याने नकार दिल्यावर तिला धमक्या देण्यास सुरुवात केली. निखिल बघेल स्वत:ला माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा पुतण्याही म्हणत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. २०१८ मध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या हस्ते त्यांच्या कॅफेचे उद्घाटनही करण्यात आले होते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121