मांजरीचे मांस खाणाऱ्या तरुणाला पाहून लोकांमध्ये भीतीचे वातावरण!

    06-Feb-2024
Total Views |
Assam man found consuming raw cat flesh in Malappuram

नवी दिल्ली : केरळमधील मलप्पुरममधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील कुट्टीपूरम बसस्थानकावर एक तरुण मांजरीचे कच्चे मांस खाताना आढळला. आसामच्या धुबरी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या व्यक्तीला तालुका रुग्णालयात प्राथमिक तपासणीनंतर कोझिकोड येथील सरकारी मानसिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या मानसिक स्थिती कमकुवत असल्याचे तपासाअंती उघड झाले.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कुट्टीपुरम बस स्टँडवर उभे असलेले लोक जेव्हा त्या तरुणाला मांजरीचे मांस खाताना पाहून घाबरले. यानंतर लोकांनी तत्काळ मलप्पुरम पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरुणाला असे करण्यापासून रोखले असता, गेल्या ४-५ दिवसांपासून तो उपाशी असल्याचे त्याने सांगितले. त्याने काहीही खाल्ले नाही.
 
यानंतर पोलिसांनी तरुणाला जेवण दिले. देबोजित रॉय असे या तरुणाचे नाव आहे. कुट्टीपुरमचे पोलिस निरीक्षक पीके पद्मराजन यांनी सांगितले की, तरुण दि. ०३ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी घटनास्थळावरून बेपत्ता झाला होता, परंतु रविवारी दि.०४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी तो कुट्टीपुरम रेल्वे स्थानकाजवळ सापडला.

चौकशीदरम्यान देबोजित रॉय तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथून केरळमधील कोझिकोड येथे आल्याचे समोर आले. त्याचा भाऊ चेन्नईत राहतो. देबोजित रॉय चेन्नई येथून बेपत्ता झाल्याचे त्याच्या भावाने पोलिसांना सांगितले. एका वरिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले की, हा माणूस काही वर्षांपूर्वी आपले मूळ राज्य सोडून केरळला पोहोचला होता.

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तरुण बराच काळ बेपत्ता होता. त्याच्या भावाने सांगितले की देबोजित रॉय त्याचा भाऊ होता, जो काही वर्षांपासून बेपत्ता होता. त्याच्या भावानेही त्याला मानसिक रुग्ण असल्याचे सांगितले. या संपूर्ण घटनेनंतर त्याच्या भावाला पोलिसांनी मलप्पुरम येथे बोलावले असून पुढील तपासासाठी तरुणाला कोझिकोड मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.