"संजय राऊत, हसी मजाक करा पण..."; किरीट सोमय्यांचे जोरदार प्रत्युत्तर

    05-Feb-2024
Total Views | 114

Raut & Somaiya


मुंबई :
संजय राऊत, हसी मजाक करा पण कोविड घोटाळ्याचा हिशोब तर द्यावाच लागेल, असे प्रत्युत्तर भाजप नेते किरीट सोमय्यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांना दिले आहे. संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप करत किरीट सोमय्यांनी त्यांच्याकडे हिशोब मागावा असे म्हटले होते. यावर आता सोमय्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
 
किरीट सोमय्या म्हणाले की, "संजय राऊत किरीट सोमैयाची भाषा, वाचा, चेष्टा करत आहेत. हसी मजाक करा. आपल्याकडे एकनाथ शिंदेच्या भ्रष्टाचारासंबंधी काही पुरावे असतील तर पोलीस स्टेशनमध्ये आणि न्यायालयात जा. परंतु, कोविड घोटाळ्याच्या हिशोब तर द्यावाच लागेल. कोविड कफन, कोविड रेमडेसिव्हिर, कोविड हॉटेल, कोविड हॉस्पिटल घोटाळ्याचा हिशोब तर राऊत द्यावाच लागणार साहेब," असेही ते म्हणाले आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121