राष्ट्रीय लोकदल रालोआमध्ये – जयंत चौधरी यांची घोषणा

    12-Feb-2024
Total Views |
Jayant Chaudhary


नवी दिल्ली:
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला धक्का देत राष्ट्रीय लोकदल पक्षाने (रालोद) भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (रालोआ) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.लोकसभा निवडणुक तोंडावर असतानाच उत्तर प्रदेशात भाजपने आपल्या यशाचा मार्ग आणखी प्रशस्त केला आहे. रालोदचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी तशी घोषणा केली आहे. ते म्हणाले, आमच्या पक्षातील सर्व आमदारांशी बोलून रालोआमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय अतिशय अल्पावधीत घ्यावा लागला असली तरीदेखील पक्षातील सर्व आमदार आणि कार्यकर्ते या निर्णयाशी सहमत आहेत, असेही चौधरी यांनी म्हटले आहे.दरम्यान, देशाचे माजी पंतप्रधान, शेतकरी नेते आणि जयंत चौधरी यांचे आजोबा चौधरी चरणसिंह यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार नुकताच जाहिर केला आहे.

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.