डीटीएच वगळून डिजिटल कंटेंट ओटीटीला प्राधान्य; महसूलात मोठी घट

    28-Oct-2024
Total Views | 96
dth digital content ott priority
 

मुंबई :       भारतातील डायरेक्ट-टू-होम(डीटीएच) उद्योगाच्या महसूल घटू लागला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे ग्राहक डिजिटल सामग्री पर्यायांना अधिक पसंती देताना दिसून येत आहे. देशातल्या चार प्रमुख डीटीएच ऑपरेटर्सचा एकत्रित महसूल ११ हजार कोटींनी घसरला आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १२,२८४ कोटी रुपये इतका महसूल होता त्यानंतर २०२३ मध्ये ११,०७२ कोटी रुपयांवर घसरला आहे.
 

दरम्यान, आता ग्राहक डीटीएच सोडून डिजिटल कंटेंट म्हणजेच ओटीटीला प्राधान्य देत आहेत ही वस्तुस्थिती बळकट झाली आहे, असे डेलॉइट इंडिया भागीदार(मीडिया) चंद्रशेखर मंथा यांनी सांगितले. सध्याच्या ट्रेंडच्या आधारे, क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड ॲनालिटिक्सचे संचालक (संशोधन), पुशन शर्मा, डीटीएच ऑपरेटर्स आणि ओव्हर द टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्ममधील महसुलातील तूट पुढील दोन ते तीन वर्षांत आणखी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


परिणामी, ओटीटीच्या प्रभावामुळे डीटीएचची कमाई कमी झाली असून महसूल घटल्याने फायबर सेवा आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. त्याचबरोबर, ग्राहक डीटीएच सेवेपासून दूर गेलेले नाहीत. लोक अजूनही डीटीएच सेवा घेत आहेत परंतु दर्शकांची संख्या आणि तासांची संख्या कमी झाली आहे, असेही सांगण्यात येत आहे. पूर्वी लोक प्रामुख्याने डीटीएच सेवांद्वारे टीव्ही पाहत असत. जागतिक महामारी कोविड-१९ च्या आधी हायब्रीड मॉडेलकडे बदल झाला, असे डिश टीव्हीचे कार्यकारी संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज डोवाल यांनी बिझनेस स्टँडर्डला सांगितले.




अग्रलेख
जरुर वाचा
मनसेला झटका! अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई

मनसेला झटका! अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई

(Avinash Jadhav) मीरा-भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून मराठीवरुन वातावरण चांगलेच तापले आहे. अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून मीरा-भाईंदर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (८ जुलै) मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत प्रतिबंधात्मक कारवाईला सुरूवात केली आहे. सोमवारपासून पोलिसांनी मनसे आणि उबाठाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली होती. मंगळवारी पहाटे पोलिसांनी आणखी कठोर पाऊल उचलत मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश ..

मेट्रोला विलंब झाल्याने घाटकोपर स्थानकात तुफान गर्दी

मेट्रोला विलंब झाल्याने घाटकोपर स्थानकात तुफान गर्दी

मेट्रोचे डबे वाढविण्याची प्रवाशांची मागणी अतिरिक्त कोच खरेदीसाठी मेट्रो वनचा प्रस्ताव मुंबई मेट्रो मार्ग १ वर तांत्रिक बिघाडामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवार,दि.७ रोजी प्रवाशांची विशेषतः कार्यालयात जाणाऱ्या मुंबईकरांची प्रचंड तारांबळ उडाली. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेला उशीर झाल्याने बघता बघता घाटकोपर स्थानकासह इतर स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली. मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेला उशीर झाल्याने गर्दी वाढली आहे. टार्गेट स्पीड गाठू न शकल्याने एक ट्रेन ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121