महाविकास आघाडीत बिघाडी? दक्षिण सोलापूरात ठाकरे विरुद्ध काँग्रेस आमने-सामने
28-Oct-2024
Total Views |
सोलापूर : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नव्हता. गेली अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीत बिघाडी होताना दिसत आहे. जागावाटपानंतर काँग्रेसची यादी जाहिर झाली असली तरीही अंतर्गत धुसफूस सुरू आहे. सोलापूर दक्षिण यागेवरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे. यामुळे दोन्ही पक्षांचे एकमेकांवर नाराजी नाट्य असल्याची माहिती आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाने दक्षिण सोलापूर मतदारसंघात अमर पाटलांना ए.बी. फॉर्म दिला आहे. ठाकरे गटाला जागा सुटली नाही. दरम्यान याप्रकऱणात अमर पाटलांना एबी फॉर्म दिल्याने प्रणिती शिंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे.
दक्षिण सोलापूरची जागा काँग्रेस ल़ढवणार असल्याचा विश्वास प्रणिती शिंदेंनी व्यक्त केला आहे. दिल्लीतील काँग्रेसच्या बैठकीनंतर सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष चेकन नरोटे यांना प्रणिती शिंदेंनी निरोप पाठवला आणि दक्षिण सोलापूरची जागा आपणच लढणार असल्याचे सांगितले.
मुंबईत ठाकरे विरुद्ध काँग्रेस अंतर्गत धुसफूस
दरम्यान आता अशीच अंतर्गत धुसफूस मुंबई काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. कारण मुंबईतील सुमारे ५० जागांवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि काँग्रेसचे उमेदवार आमनेसामने येऊ शकतात, असे मानले जात आहे. या पाच जागांमध्ये वर्सोवा, भायकाळा, वडाळा, घाटकोपर पश्चिम, वांद्रे पूर्व आणि मुलुंड यांचा समावेश आहे.